agriculture news in Marathi, normal rain in few places in state, Maharashtra | Agrowon

तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

पुणे : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या दक्षिण भागात कमी दाबाच्या क्षेत्राचे काही प्रमाणात चक्राकार वाऱ्यामध्ये रूपातर झाले. गुरुवारी (ता.२५)  उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा, सरमकुंडी, वडगाव, येडशी; नगर जिल्ह्यातील बेलापूर, पारनेर साताऱ्यातील वाई येथे दुपारनंतर अचानक सोसाट्याचा जोरदार वारा सुटून ढग दाटून आले. त्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या असून, शेतकऱ्यांची काही प्रमाणात तारांबळ उडाली. 

पुणे : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या दक्षिण भागात कमी दाबाच्या क्षेत्राचे काही प्रमाणात चक्राकार वाऱ्यामध्ये रूपातर झाले. गुरुवारी (ता.२५)  उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा, सरमकुंडी, वडगाव, येडशी; नगर जिल्ह्यातील बेलापूर, पारनेर साताऱ्यातील वाई येथे दुपारनंतर अचानक सोसाट्याचा जोरदार वारा सुटून ढग दाटून आले. त्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या असून, शेतकऱ्यांची काही प्रमाणात तारांबळ उडाली. 

 मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भाग, कर्नाटक या परिसरात समुद्रसपाटीपासून सुमारे ९०० मीटर उंचीवर कमी चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. तसेच विदर्भ ते तेलंगानादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. त्यामुळे राज्यात तुरळक ठिकाणी अचानक काळेकुट्ट ढग भरून येत असून, काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. गुरुवारी (ता.२५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्रातील मिरज, पाटण, तासगाव येथे वीस मिलिमीटर, फलटण, सांगली, विटा येथे दहा मिलिमीटर पाऊस पडला. मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे ३० मिलिमीटर, बीड जिल्ह्यातील शिरूर, अनंतपाल येथे दहा मिलिमीटर पाऊस पडला. 

उत्तरकडून काही प्रमाणात थंड वारे वाहण्यास सुरुवात झाल्याने खानदेशातील काही भागांत किमान तापमानात घट होत आहे. नाशिकमध्ये १४.६ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झाली. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या दक्षिण भागात ढगाळ हवामान असल्याने किमान तापमानात किचिंत वाढ झाली आहे. कोकण आणि विदर्भात हवामान कोरडे 
होते. 

किमान तापमानाबरोबर कमाल तापमानात काही अंशी चढउतार होत आहे. मुंबई जवळील सांताक्रूजमध्ये सर्वाधिक ३७.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. आज (ता.२६) संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहणार असून, काही प्रमाणात थंडी हातपाय पसरण्यास सुरुवात करण्याची शक्यता आहे.  

गुरुवारी (ता.२५) सकाळी आठ वाजेपर्यंचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये) :  मुंबई (सांताक्रूज) २२.०, अलिबाग २१.५, ठाणे १८.२, रत्नागिरी २४.६, डहाणू २२.०, पुणे १८.४, नगर १८.०, कोल्हापूर २२.२, महाबळेश्वर १८.२, मालेगाव १९.२, नाशिक १४.६, सांगली १९.८, सातारा २०.७, सोलापूर २२.५, औरंगाबाद १७.६, परभणी १७.२, नांदेड २१.०, अकोला १९.३, अमरावती १८.८, बुलढाणा २०.८, चंद्रपूर २०.४, गोंदिया १७.२, नागपूर १६.५, वर्धा १७.५.

इतर अॅग्रो विशेष
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...
पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटककोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या...
उन्हाचा चटका वाढणार; नांदेडला तुरळक...पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने...
वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडीअकोला : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...