agriculture news in Marathi, normal rain possibilities in central Maharashtra and Kokan, Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्र, काेकणात हलक्या पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 मार्च 2018

पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने शनिवारपासून मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित ठिकाणी कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.   

पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने शनिवारपासून मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित ठिकाणी कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.   

राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहे. मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसानंतर आता पहाटे गारठा तर दुपारी उन्हाचा चटका अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे दिवस-रात्रीच्या तापमानात घट झाली असून, तापमानातील तफावत वाढली आहे. शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे दिवसाचे तापमान उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस पुण्यात रात्रीचे नीचांकी १२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. 

राज्यातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात दिवस आणि रात्रीच्या तापमानात जवळपास १६ ते २४ अंशांची तफावत असल्याचे दिसून आले आहे. पहाटेचे तापमान कमी झाल्याने गारठा वाढला अाहे. तर दुपारी उन्हाचा चटका वाढून तापमानात वाढ होत आहे. दोन दिवसांमध्ये विदर्भासह महाराष्ट्राच्या तापमानात वाढ होणार असन्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  

मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९.५ किलोमीटर उंचीवर पश्‍चिम दिशेकडून वेगवान वारे वाहत आहेत. तर पूर्व भारतात बिहारपासून तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

 शुक्रवारी (ता. २३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.६ (१२.४), नगर ३८.६(१४.३), जळगाव ३६.२(२०.०), कोल्हापूर ३५.७ (१८.५), महाबळेश्वर ३०.२(१४.०), मालेगाव ३७.०(१८.२), नाशिक ३३.०(१६.४), सांगली ३७.१(१७.१), सातारा ३५.३(१३.९), सोलापूर ३७.६(२०.३), मुंबई ३१.०(२३.०), रत्नागिरी ३३.०(२०.४), डहाणू २९.६(२०.६), भिरा ३९.०(१७.०), औरंगाबाद ३४.४(२०.२), परभणी ३८.०(१९.७), नांदेड ३९.०(१८.०), अकोला ३७.५(२०.५), अमरावती ३६.८(१९.०), बुलडाणा ३४.२(२१.०), चंद्रपूर ३९.०(२१.४).

इतर अॅग्रो विशेष
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...