राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज

राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज
राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज

पुणे : राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर ओसरला आहे. बुधवारी (ता. २५) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. येत्या सोमवार (ता.३०) पर्यंत कोकणात हलका ते मध्यम स्वरूपाचा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अधूनमधून हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.  उत्तर प्रदेशाच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रांचे रूपांतर चक्राकार वाऱ्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. तसेच, उत्तर प्रदेशात असलेले कमी दाबाचे क्षेत्र हे बंगालच्या उपसागरांपर्यंत सक्रिय आहे. उडिसाच्या परिसरात समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. येत्या सोमवारपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा जोर कोकणात काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांतील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातही सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली असून, अनेक भागांत ढगाळ हवामान होते. विदर्भातही बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागांत हलका पाऊस पडला.

गुरुवारी (ता.२६) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस ः मिलिमीटरमध्ये कोकण ः धसइ १७, देहरी १३, नयाहडी १८, सरळगाव १२, वसींड १०, डोलखांब २६, नेरळ २७, कळंब १०, वौशी १६, आटोने १०, इंदापूर १६, मरगतम्हाणे १०, वाहल ११, कलकावणे १०, शिरगाव ३५, दापोली १३, बुरवंडी १०, दाभोल ११ , अंजरला १०, पालगड १५, वेलवी १३, खेड १२, शिरशी १२, धामनंद २२, पटपन्हाले २५, अबलोली १०, मंडणगड १४, देव्हरे १९, कोटवडे १९, मालगड १०, फुंगुस १०, फनसावणे १४, देवली १७, तुलसानी १७, माभले १५, तेरहे २१, राजापूर २३, सवंडल २७, कोंडीया १६, कुमभवडे १३, नाटे १२, ओनी १९, पाचल १४, लांजा १३, विलवडे १० पाटगाव १९, मालवण १०, पेंडूर २४, श्रावण ११, अमबेरी १९, बांडा १५, आजगाव १३, कनकवली १४, फोंडा १२.४, सांगवे १५, तालेरे २६, वागडे १३, कसाल १४, मानगाव १९, वैभववाडी ११, येडगाव१७, भुइबावडा १६, तालवट २०, भेडशी मध्य महाराष्ट्र ः नाणशी ११, इगतपुरी २४, घोटी १३, धारगाव १६,पेठ १३, बोराडी २५, खोंडामळी २६, चुलवड १५, खुंटामोडी २३, तोरणमाळ १२, दाब ५१, मोलगी २१, निंभोरा १०, एरंडोल १५, साळवा १६, पिंप्री ११, सोनवद १७, शेंडी ४७, घोटावडे १४, माले २८, मुठे २८, भोलावडे २२, निगुडघर १२, काले १२, कार्ला १८, खडकाळा २०, लोणावळा ११, डिंगोरे ११, आपटाळे १८ बामणोली १६, केळघर १०, हेळवाक २७, मरळी १०, मोरगिरी १४, कुठरे १६, महाबळेश्‍वर २६.२, तापोळा २६.२, लामज ७६, ताकारी १०, चरण १४.२, पन्हाळा १०, पडळ ११, बाजार १९, करंजफेन २३, आंबा ५१, राधानगरी २५, सरवडे १३, राशिवडे १४, कसबा १०, गगनबावडा १९, साळवण ३६, करवीर १०, निगवे १४, बालिंगा १३, कापशी १६, कडेगाव १०, कराडवाडी १२, आजरा १५, गवसे २८, मलिग्रे १३, चंदगड ११, नारंगवाडी १२, तुर्केवाडी १६, हेरे १८. मराठवाडा : कलंबर २३ विदर्भ ः जामोद १०, संग्रामपूर १०, सोनाळा ११, बावनबीर १२, कवठळ ११, खामगाव १४, पी १३, जवळा १५, अडगाव १२, पाथर्डी १०, पारस १३, उरळ १६, राजंदा १०, कारंजा १४, चिखलदरा २६, सेमडोह २३, चुर्ण २०, नाकडोंगरी १२, तुमसर १८, गंगाझारी १२, दासगाव १४, काट्टीपूर १०, तिगाव १२.८, ठाणा १२.२, वाडेगाव १३.४,, ठाणेगाव ११.२, मोहाडी १२.३, सालेकसा १९, शिखारीटोळा १३, महागाव १०.६, दावा ३०, बेंबळ १०.८, गडचिरोली १४.५, ब्राह्मणी १६, चामोर्शी ११, एटापल्ली १३.६, कासंसूर १२.४, गाट्टा १७.२धानोरा १७.२, मुरूमगाव ११.८,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com