agriculture news in marathi, normal rain possibilities in state, Maharashtra | Agrowon

राज्यात तुरळक पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

पुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. कोकण, घाटमाथ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ७) कोकणात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. कोकण, घाटमाथ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ७) कोकणात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात पाऊस आसरला आहे. राज्यात ऊन सावल्यांचा खेळ सुरू असून, मधूनच एखादी जोरदार सर येत असल्याने श्रावण सरींचा अनुभव येत आहे. यामुळे राज्याच्या तापमानातही चढ उतार सुरू आहेत, अनेक ठिकाणी पारा सरासरीच्या वर गेला आहे. माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या भटिंडापासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रीय आहे. तर बंगालच्या उपसागरात गुरुवारपर्यंत (ता. ६) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

सोमवारी (ता. ३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्त्रोत - हवामान विभाग) :
कोकण : माणगाव ७०, खालापूर, माथेरान, पोलादपूर प्रत्येकी ४०, कर्जत महाड, म्हसळा, मुरबाड, पेण, रोहा, शहापूर प्रत्येकी ३०, भिरा, मंडणगड, मुरुड, पनवेल, सुधागड, उरण प्रत्येकी २०. 
मध्य महाराष्ट्र : लोणावळा, महाबळेश्‍वर प्रत्येकी ८०, इगतपुरी, पौड, मुळशी प्रत्येकी ४०, वेल्हे ३०, जावळी, वडगाव प्रत्येकी २०, अक्कलकुवा, अकोले, आंबेगाव, घोडेगाव, चंदगड, एरंडोल, हर्सुल, कर्जत, मोहोळ, पेठ, राधानगरी, सुरगाणा प्रत्येकी १०. 

मराठवाडा : परळी वैजनाथ, तुळजापूर प्रत्येकी २०, जाफराबाद, किनवट, पुर्णा, सोयगाव, उदगीर प्रत्येकी १०.
विदर्भ : गोंदिया ५०, भद्रावती, सावळी प्रत्येकी ३०, मूल २०, भामरागड, बुलडाणा, चामोर्शी, चंद्रपूर, जेवती, कोपर्णा, मेहकर, मुलचेरा, सिंदेवाही प्रत्येकी १०.
घाटमाथा : दावडी १००, 
डुंगरवाडी ९०, शिरगाव ८०, आंबोणे ६०, वळवण, खोपोली प्रत्येकी ५०, शिरोटा ३०. 

इतर अॅग्रो विशेष
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...
विदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे   : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...