Agriculture News in Marathi, northeast monsoon active in South india, extremely heavy rainfall over costal Tamilnadu | Agrowon

ईशान्य मोसमी पावसाचा दक्षिणेत जोर वाढला
वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017
चेन्नई, तमिळनाडू ः दक्षिण भारतात ईशान्य मोसमी पावसाचा जोर वाढला अाहे. मंगळवारी (ता. ३१) सकाळी साडेअाठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत तमिळनाडूचा किनारी भाग अाणि पुद्दुचेरी भागात अतिवृष्टी झाली अाहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली अाहे.
 
चेन्नईमध्ये गेल्या चोवीस तासांत १७ सेंटिमीटर पावसाची नोंद झाली अाहे. पुढील तीन दिवस चेन्नई अाणि अाजूबाजूच्या भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला अाहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईसह कांचीपूरम, तिरुवल्लूर भागातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात अाली अाहेत.
 
चेन्नई, तमिळनाडू ः दक्षिण भारतात ईशान्य मोसमी पावसाचा जोर वाढला अाहे. मंगळवारी (ता. ३१) सकाळी साडेअाठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत तमिळनाडूचा किनारी भाग अाणि पुद्दुचेरी भागात अतिवृष्टी झाली अाहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली अाहे.
 
चेन्नईमध्ये गेल्या चोवीस तासांत १७ सेंटिमीटर पावसाची नोंद झाली अाहे. पुढील तीन दिवस चेन्नई अाणि अाजूबाजूच्या भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला अाहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईसह कांचीपूरम, तिरुवल्लूर भागातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात अाली अाहेत.
 
मंगळवारी (ता. ३१) सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिल्याने चेन्नई शहरात ठिकठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. शहरातील सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरे खाली करण्यात अाली अाहेत. अनेक ठिकाणी वीजसेवा खंडित झाली अाहे. तंजावर जिल्ह्यात घराची भिंत कोसळून ३८ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला अाहे.
 
चेन्नईमधील तांबाकरम भागात दोन फुटांपर्यंत पाणी साचले अाहे. त्यामुळे वाहतूकसेवा विस्कळित झाली अाहे. पावसाचा जोर वाढत असल्याने चेन्नई शहर प्रशासनाने राष्ट्रीय अापत्ती निवारण दलाची (एनडीअारएफ) नऊ पथके पाठविण्याची विनंती केली अाहे.
 
मुसळधारेचा इशारा
तमिळनाडूसह पुद्दुचेरी, केरळ अाणि अांध्र प्रदेशामधील दक्षिणेकडील किनारी भागांत बुधवारी (ता. १) जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला अाहे. 

इतर ताज्या घडामोडी
पुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...
पुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे  : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...
अौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...
पुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...
सीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...
‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...
वनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती  ः पानपिंपरी तसेच वनौषधी...
मराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...
नगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...
पानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...
डॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....
दाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...
उपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...
आंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...
औरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
चुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...
ओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...
पुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे  : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे   ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...