agriculture news in Marathi, not change in foreign trip, Maharashtra | Agrowon

विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत बदल नाही
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या शेतकऱ्यांची आधीची यादी कायम ठेवण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. विदेश अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्याची योजना राज्य शासनाच्या खर्चातून राबविली जाते. शेतकऱ्याने ६१ हजार रुपये भरल्यानंतर तेवढेच अनुदान शासन देते. यामुळे इस्त्राईलचा सहा दिवस अभ्यास करण्याची संधी मिळते. 

 राज्यभरातून यंदा अर्ज मागविण्यात आले. ७५० शेतकऱ्यांची प्रतीक्षा यादी देखील तयार केली गेली आहे. तथापि, मार्चमध्ये वित्तीय वर्ष समाप्त होत असल्यामुळे या यादीबाबत पुढे काय निर्णय घेतला जाणार, याविषयी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. 

पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या शेतकऱ्यांची आधीची यादी कायम ठेवण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. विदेश अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्याची योजना राज्य शासनाच्या खर्चातून राबविली जाते. शेतकऱ्याने ६१ हजार रुपये भरल्यानंतर तेवढेच अनुदान शासन देते. यामुळे इस्त्राईलचा सहा दिवस अभ्यास करण्याची संधी मिळते. 

 राज्यभरातून यंदा अर्ज मागविण्यात आले. ७५० शेतकऱ्यांची प्रतीक्षा यादी देखील तयार केली गेली आहे. तथापि, मार्चमध्ये वित्तीय वर्ष समाप्त होत असल्यामुळे या यादीबाबत पुढे काय निर्णय घेतला जाणार, याविषयी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. 

“चालू वर्षात विदेशी दौऱ्यांसाठी शेतकऱ्यांना वाटण्याकरिता ३५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यातून ५२ शेतकऱ्यांना अलीकडेच इस्त्राईलच्या दौऱ्यावर नेण्यात आले. मात्र, अनुदान अजून शिल्लक आहे. पुढील वर्षी मात्र जादा अनुदान आणि जास्त शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यावर पाठविण्याचा प्रयत्न आमचा आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

आत्माचे संचालक अनिल बनसोडे यांच्या म्हणण्यानुसार, विदेश अभ्यास दौऱ्यासाठी युरोपपेक्षाही आम्ही जास्त पसंती इस्त्राईलसाठी दिली आहे. पुढील सर्व दौरे इस्त्राईलकडेच जातील. सूक्ष्म सिंचन, दुग्ध व्यवसाय, पशुधन आणि प्रक्रिया उद्योगाची चांगली माहिती शेतकऱ्यांना मिळत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
विदेश अभ्यास दौऱ्यासाठी सर्व जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडील पासपोर्ट, सातबारा तसेच अत्यावश्यक कागदपत्रांची छाननी करून प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. काही शेतकरी अचानक दौऱ्यासाठी नकार देतात. अशा वेळी यादीतील क्रमाने खालच्या शेतकऱ्याला संधी दिली जाते. 

यापूर्वी विदेश अभ्यास दौऱ्यासाठी केवळ अर्ज मागविले जात होते. मात्र, दौरे काढले जात नसल्याने अर्जदार शेतकरी नाराज होते. यंदा प्रथमच इस्त्राईलमध्ये दौरा काढण्यात आला. तथापि, एक शेतकरी आजारी पडल्यामुळे इस्त्राईलमध्ये अडकून पडला. यामुळे कृषी खात्याने पुढील दौऱ्याच्या रचनेत काही धोरणात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या यादीतील शेतकऱ्यांना संधी मिळाल्याशिवाय नवी यादी तयार करण्याचे कृषी आयुक्तालयाने ठरविले आहे.  

परिपूर्ण आरोग्य विमा देणार 
“विदेश दौऱ्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्याला परिपूर्ण आरोग्य विमा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. इस्त्राईलच्या अलीकडच्या दौऱ्यात परिपूर्ण विमा नसल्यामुळे अडकून पडलेल्या शेतकऱ्याला मायदेशी आणण्यासाठी मोठी कसरत कृषी विभागाला करावी लागली. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.

इतर अॅग्रो विशेष
कडवंची : अर्थकारणाला मिळाली बचत गटांची...शेती आणि ग्रामविकासामध्ये महिलांचा महत्त्वपूर्ण...
कडवंची : डाळिंबात तयार केली ओळखकडवंची हे द्राक्षाचे गाव. याच गावातील ज्ञानेश्वर...
कडवंची : रोपवाटिका अन्‌ शेळीपालनाची जोडकडवंचीमधील सखाराम येडूबा क्षीरसागर यांनी केवळ...
कडवंची : पाणंदमुक्‍त रस्त्यांची...रस्ते, पाणी आणि वीज हे शेतीविकासातील महत्त्वाचे...
कडवंची : घरापुरते दूध अन् शेणखतासाठी...द्राक्षाचे गाव असलेल्या कडवंचीमधील प्रत्येक...
कडवंची : पाणलोटाचं स्वप्न साकारकडवंची गावात जल, मृद संधारण, शेती विकासामध्ये...
कडवंची : लोकसहभाग, पाणी व्यवस्थापन हेच...कडवंची गावात द्राक्षातून समृद्धी दिसत असली तर...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...
कडवंची : संघर्षातून पेललंय आव्हानकडवंचीमधील महिलांनीदेखील द्राक्ष शेतीमध्ये...
कडवंची मॉडेल : कोरडवाहूसाठी दिशादर्शक...मराठवाड्यात पावसावर आधारित कोरडवाहू शेतीला बळकट...
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...
कडवंची : पीक बदलाच्या दिशेने; पपई...विहीर, शेततळ्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध...
कडवंची : जमीन सुपीकतेसाठी बायोगॅस स्लरी कडवंचीमधील शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्राची उभारणी...
कडवंची : बागेला मिळाली यंत्रांची जोडप्रयोगशील द्राक्ष बागायतदार सुरेश दगडू पाटील...
कडवंची : जल, मृद्संधारणातूनच रुजलं...कडवंची गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खरपुडी...
कडवंची : पाणी व्यवस्थापन, नवतंत्रातून...काटेकोर पाणी आणि खतांचा वापर, पीक व्यवस्थापनात...
कडवंची : खरपुडी ‘केव्हीके’चे रोल मॉडेलकडवंची हे कृषी विज्ञान केंद्राचे पहिले दत्तक गाव...
‘वॉटर बजेट’ कडवंचीचे वैशिष्ट्यपाणलोट विकास, पीक बदल, पूरक उद्योगात मनापासून...
विदर्भातील संत्रा पट्ट्यात आंबिया...नागपूर ः विदर्भातील वाढत्या तापमानाचा संत्रा...
एनएचबी ‘एमडी’चा वाद पंतप्रधानांपर्यंतपुणे : देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत...