agriculture news in marathi, Not Increasing water stock of Khandesh dams | Agrowon

खानदेशातील धरणांचा पाणीसाठा कमीच
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

आमच्या भागात भीजपाऊस झाला. जोरदार पाऊस या पावसाळ्यात झालाच नाही. पुढे रब्बी हंगामासाठी अपेक्षित पाणी विहिरी, कूपनलिकांना नाही.
                                                                      - अजित पाटील, गाळण (जि. जळगाव)

जळगाव : अपेक्षित पाऊस न झाल्याने खानदेशातील मोठ्या धरणांमध्ये यंदा हवा तसा जलसाठा नाही. यामुळे पुढील काळात रब्बी हंगामासह पिण्याच्या पाण्यासंबंधी अडचणी उभ्या राहण्याची शक्‍यता आहे. गिरणा, वाघूर ही जळगाव जिल्ह्यातील प्रमुख धरणे ५० टक्केही भरलेली नाहीत. धुळे जिल्ह्यातील काही प्रकल्प कोरडेच आहेत. रब्बी हंगामाचे चित्रही फारसे आशादायी नाही. केवळ तापी व गिरणा काठावरील गावांसह काळी कसदार जमीन असलेल्या भागात रब्बी हंगाम बरा राहील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

धुळे जिल्ह्यातील बुराई प्रकल्पात ८३ टक्के, जामखेडी, पांझरा, सारंगखेडा व अमरावती प्रकल्पात १०० टक्के, अनेरमध्ये ९२ टक्के,  मालनगाव प्रकल्पात ९९ टक्के जलसाठा आहे. कनोली व अमरावती प्रकल्प मात्र कोरडेच आहेत. करवंद प्रकल्पात ७१ टक्‍के, तर तापी नदीवरील सुलवाडे बॅरेजमध्ये ४६ टक्के जलसाठा आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा बॅरेज, रंगावली व दरा प्रकल्पात १०० टक्के, शिवन प्रकल्पात ४२ टक्के जलसाठा आहे. जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील बोरी, बहुळा, मन्याड, भोकरबारी व अंजनी प्रकल्प कोरडे आहेत. रावेर तालुक्‍यातील मंगरूळ, अभोरा व सुकी प्रकल्प १०० टक्के, गिरणा धरणात ४८ टक्के जलसाठा आहे. यावर २१ हजार हेक्‍टरवरील रब्बी पिकांचे भवितव्य अवलंबून आहे. जळगाव, जामनेरची तहान भागविणाऱ्या आणि सुमारे सात हजार हेक्‍टरसाठी लाभदायी ठरणाऱ्या वाघूरमध्ये ४७ टक्केच जलसाठा आहे. यावल तालुक्‍यातील मोर प्रकल्पात ५५ टक्के, अग्नावती प्रकल्पात ८८ टक्के, तापी नदीवरील हतनूर धरणात ९५ टक्के जलसाठा आहे. यातून रब्बीसाठी तीन आवर्तने मिळू शकतील. जामनेरातील तोंडापूर प्रकल्पात पाच, तर चोपडा तालुक्‍यातील गूळ प्रकल्पात ८६ टक्के जलसाठा आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...
सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...
जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
सागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...
मधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...
खानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....
ऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...
नाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...
गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
परभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...
खरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...