agriculture news in marathi, Notice to 70 thousand borrowers from Solapur District Bank | Agrowon

सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार कर्जदारांना नोटिसा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

दर पाच वर्षांतून किमान दोन वेळा सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती उद्‌भवते. त्यामुळे राज्यभर सरसकट नियोजन करण्याऐवजी प्रत्येक जिल्ह्यांसाठी ठोस नियोजन व्हावे. जेणेकरून जिल्हा बॅंकांवर आधारित असलेल्या बळिराजाच्या अडचणी सुटतील आणि बॅंकांची वसुली चांगली होईल.
 - किसन मोटे, सरव्यवस्थापक, सोलापूर जिल्हा बॅंक

सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा लाख कर्जदारांपैकी अद्यापही ४० हजार कर्जदारांची यादीच बॅंकेला प्राप्त न झाल्याने तब्बल २५३ कोटी रुपये शासनाकडे अडकले अाहेत. मार्च २०१७ मध्ये कर्ज घेऊनही जून २०१८ मध्ये कर्जदारांनी कर्जाची परतफेड न केल्याने बॅंकेने तब्बल ७० हजार कर्जदारांना वसुलीची नोटीस दिल्याचे बॅंकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी सांगितले.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना २५ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान आणि दुसरीकडे कर्ज थकवून बॅंकेला अडचणीत आणलेल्यांना दीड लाखाची माफी, असा दुजाभाव केल्याने मागच्या वर्षी बॅंकेच्या ७० हजार शेतकरी कर्जदारांनी बॅंकेचे कर्जच फेडले नाही.

कर्जमाफीची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून ठप्पच आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत बॅंकेची नव्याने ८३२ कोटी रुपयांची थकबाकी वाढली आहे. त्यातच वारंवारच्या दुष्काळी परिस्थितीमुळेही कर्जवसुली स्थगित केल्याने थकबाकीत वाढ होत आहे. त्याचा परिणाम मात्र आता रब्बी हंगामात होणार आहे. पाण्याअभावी पिके संकटात आली आहेत. परिणामी, रब्बीच्या कर्जवाटपातही घट होणार आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे आता पुन्हा वसुलीसाठी बॅंकेला प्रयत्न करावे लागणार आहेत, असे सांगण्यात आले. त्यानुसारच या नोटिसा देण्यात येत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
संत्रा, मोसंबी व लिंबू सल्लाअांबिया बहर व्यवस्थापन ः अांबिया बहराच्या...
गुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजनासध्या सर्वत्र कापसाची वेचणी सुरू आहे. डिसेंबर...
धुळे महापालिकेत सत्तांतर, भाजपला मोठे यशधुळे : धुळे महापालिकेत भाजपने ७४ पैकी ५० जागांवर...
खानदेशातील दूध उत्पादकांना कमी दराचा...जळगाव : खानदेशात सहकारी संघ आणि खाजगी डेअऱ्या...
कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची मागणीधुळे : कांद्याची लागवड खानदेशात वाढत आहे....
सोलापुरात बावीस रुपयांच्या आतच दूध दरसोलापूर : शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
कोल्हापुरात दूधदरात कपात नाहीकोल्हापूर : सध्या अनुदानाच्या मुद्द्यावरून...
परभणीत दूध संकलनात वाढ; दरकपातीमुळे...परभणी ः दुष्काळी परिस्थिती तसेच शासकीय दूध...
सरकारला कृषी धोरणावरच बोलायला लावू ः...शिर्डी, जि. नगर : देश आणि राज्यातील शेतकरी अडचणीत...
धुळे जिल्ह्यात रब्बी पीककर्ज वितरण...जळगाव  ः खानदेशात खरिपात जसे बॅंकांनी...
सांगलीत अनुदान रक्कम येईपर्यंत दूधदरात...सांगली ः जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे ३५ दूध...
‘महाएफपीसी’ करणार ५ हजार टन कांदा संकलनपुणे  ः कमी झालेल्या कांदा स्थिरता...
पुणे विभागात पाण्याअभावी ज्वारीचे पीक...पुणे   ः कमी पावसामुळे रब्बी ज्वारीला...
राज्य सेवा आयोगाकडून ३४२ पदांच्या...मुंबई : राज्य सेवा आयोगाकडून शासनाच्या विविध...
वऱ्हाड खासगी डेअरींकडून दूध दरकपातीची...अकोला   ः उत्पादनवाढीचे कारण देत खासगी दूध...
कांदा चाळ अनुदानापासून पुणे...पुणे   ः कमी दरामुळे कांदा साठवणुकीकडे...
नगर महापालिका निवडणूकीत शिवसेना ठरला...नगर  : नगर महापालिका निवडणुकीचा निकाल...
भंडारा जिल्ह्यात खासगी खरेदीदारांकडून...भंडारा  ः पूर्व विदर्भात दूध संकलनात आघाडीवर...
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...