agriculture news in Marathi, Notice to eight agri officers in yavatmal district, Maharashtra | Agrowon

यवतमाळात पंचायत समितीच्या आठ कृषी अधिकाऱ्यांना नोटीस
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 डिसेंबर 2017

यवतमाळ ः प्रशासनाला माहिती देण्यात दिरंगाई व वेळकाढूपणा केल्याने फवारणीमुळे विषबाधा होण्याच्या प्रकाराची तीव्रता वाढली, असा ठपका ठेवत जिल्ह्यातील आठ पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

फवारणीदरम्यान विषबाधा होऊन जिल्ह्यातील २२ शेतकरी, शेतमजुरांना जीव गमवावा लागला. त्यासोबतच ४०० पेक्षा अधिकांवर उपचार करण्यात आले. राज्य सरकारकडून या प्रकरणी एस.आय.टी.मार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

यवतमाळ ः प्रशासनाला माहिती देण्यात दिरंगाई व वेळकाढूपणा केल्याने फवारणीमुळे विषबाधा होण्याच्या प्रकाराची तीव्रता वाढली, असा ठपका ठेवत जिल्ह्यातील आठ पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

फवारणीदरम्यान विषबाधा होऊन जिल्ह्यातील २२ शेतकरी, शेतमजुरांना जीव गमवावा लागला. त्यासोबतच ४०० पेक्षा अधिकांवर उपचार करण्यात आले. राज्य सरकारकडून या प्रकरणी एस.आय.टी.मार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

एस.आय.टी.ची चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. 
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी वेळकाढूपणाचा ठपका ठेवत पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

त्यांच्याकडून या प्रकरणी सविस्तर खुलासाही मागण्यात आला. त्यानंतर आता यातील आठ कृषी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुुरू करण्यात आली आहे. कीटकनाशक फवारणीमुळे झालेल्या परिणामाची वरिष्ठांना वेळीच माहिती देण्यात दिरंगाई केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.

वरिष्ठांना वेळेत माहिती मिळाली असती, तर उपाययोजना करून शेतकरी, शेतमजुरांचे प्राण वाचविता आले असते, असा दावा प्रशासनाने केला आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...
इतिवृत्तात शेतकरी प्रतिनिधींच्या...नांदेड : ऊसदर निश्चित करण्याच्या बाबतीत...
पंतप्रधान दौऱ्याच्या दिनी मनसे वाटणार...यवतमाळ : निवडणुकीपूर्वी अच्छे दिनचे स्वप्न...
जमीन गैरव्यवहार चौकशी 'सक्तवसुली'मार्फत... पुणे : सोलापूरच्या जुनी मिल नावाने ओळखल्या...
उन्हाळी भुईमुगावरील रसशोषक किडींचे...उन्हाळी भुईमुगामध्ये पीक कालावधीत सुरवातीच्या...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २०००...परभणीत ६०० ते १००० रुपये  परभणी...
फुलांना भेट देणाऱ्या किटकांचे डीएनए...किटकांनी फुलांना भेट दिल्यानंतर तिथे सूक्ष्म असे...
रेशीम उत्पादकांचे उपोषण अखेर सुटलेजालना : मनरेगाअंतर्गत मिळणारे पेमेंट...
जळगावात शिक्षकांची 'व्हॉट्‌सॲप'वरून...जळगाव : शाळेत वेळेवर न येणे, वेळेअगोदरच शाळा...
जळगाव जिल्ह्यात `किसान सन्मान`च्या...जळगाव  : केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर...
आरफळची ऊसबिलातून पाणीपट्टी वसूलतासगाव, जि. सांगली : दुष्काळी पार्श्वभूमीवर...
गोंदिया जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना...गोंदिया : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत...