agriculture news in marathi, notice to farmer due to poisoning to labor, Maharashtra | Agrowon

शेतमजुराच्या विषबाधेप्रकरणी तेजापूरच्या शेतकऱ्याला नोटीस
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

वणी, यवतमाळ  : शेतमजुराला फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधेला शेतकरी कारणीभूत असल्याप्रकरणी पहिली कारवाई यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आली आहे. मजुराच्या जीविताला धोका पोचविल्याचा आरोप करीत तीन दिवसांत याप्रकरणी खुलासा करण्याचे आदेश तहसीलदारांनी संबंधित शेतकऱ्याला नोटीसच्या माध्यमातून दिल्याने खळबळ उडाली आहे. 

वणी, यवतमाळ  : शेतमजुराला फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधेला शेतकरी कारणीभूत असल्याप्रकरणी पहिली कारवाई यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आली आहे. मजुराच्या जीविताला धोका पोचविल्याचा आरोप करीत तीन दिवसांत याप्रकरणी खुलासा करण्याचे आदेश तहसीलदारांनी संबंधित शेतकऱ्याला नोटीसच्या माध्यमातून दिल्याने खळबळ उडाली आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षी २२ जणांचा, तर राज्यात ४९ शेतकरी, शेतमजुरांचा फवारणीदरम्यान विषबाधेने मृत्यू झाला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर अशा घटनांतील मृतकांना आता चार लाख रुपयांची मदत दिली जाते. दरम्यान, वाढत्या विषबाधांच्या घटनांवर नियंत्रणासाठी शासनाने शेतमजुरांच्या विषबाधेला शेतकऱ्याला जबाबदार ठरविण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यातूनच पहिल्यांदा करण्यात आली आहे. तेजापूर (ता. वणी) येथील अंकुश बंडू भोयर (वय ३०) या शेतमजुराला २१ ऑगस्ट रोजी फवारणीदरम्यान विषबाधा झाली होती.

त्याला सुरवातीला वणी येथील रुग्णालयात व नंतर यवतमाळला दाखल करण्यात आले. सद्या त्याची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
दरम्यान, याप्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाकडून घेण्यात आली. तहसीलदार रवींद्र जोगी यांनी शेतकरी विजय लक्ष्मण मालेकार (रा. तेजापूर) यांना नोटीस बजावली. फवारणी करते वेळी शेतमजुराला संरक्षण साहित्य (सेफ्टी कीट) पुरविली नाही. त्यासोबतच वापरलेले कीटकनाशक अतिजहाल, प्रतिबंधित किंवा अनधिकृत असण्याचीदेखील शक्‍यता आहे.

फवारणी करताना काय काळजी घ्यावी, याविषयी ग्रामसभेत व इतर विविध पर्यायांतून प्रशासनाने जागृती केली. त्याचीदेखील दखल संबंधित शेतकऱ्याने घेतली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याच कारणामुळे शेतमजुराच्या जीविताला धोका निर्माण झाल्याप्रकरणी जबाबदार धरत संबंधित शेतकऱ्याला नोटीस बजावण्यात आल आहे. याप्रकरणी गुरुवारी (ता.३०) विजय मालेकार यांना तहसीलदारांसमोर लेखी खुलासा सादर करायचा आहे. 

इतर अॅग्रो विशेष
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...