अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी लागवडप्रकरणी केंद्राची राज्याला नोटीस

बियाणे
बियाणे

अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस बियाणे तसेच जीएम बियाण्यांची लागवड होत असल्याचे प्रकार घडत आहेत. याच आठवड्यात जिल्हयात अकोली जहाँगीर येथे अशा बियाण्याची जाहीर लागवड झाली आहे. याची दखल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेतली असून, राज्याला तातडीने याबाबत पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यावरण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव ऋचा शर्मा यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र देत तातडीने खुलासा मागितला आहे. अकोली जहाँगीर येथे शेतकरी संघटनेचे एचटीबीटी कापूस बियाणे व जीएम वांग्यांची लागवड करण्याची घोषणा केली होती. ठरल्याप्रमाणे या ठिकाणी बीटी बियाण्याची लागवड करण्यात आली. यामुळे देशभरात खळबळ उडाली. याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पत्र लिहिले. देशात आंध्र प्रदेश, हरियाना, महाराष्ट्र तसेच पंजाबमध्ये अशा प्रतिबंधित बियाण्यांची लागवड केल्याचे समोर आले आहे.  सोमवारी (ता. १०) अकोली जहाँगीर येथे या बियाण्याची लागवड झाली. याबाबत राजेश क्रिष्णन यांनी पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे अकोली येथील घटनेची चौकशी करावी. बियाण्याची तपासणी करून यापुढे प्रतिबंधित बियाणे लागवड रोखण्यासाठी कारवाई करावी. त्याचा अहवाल केंद्राला सादर करावा, असे सचिवांना सुचविले आहे.  जिल्ह्याचा शासनाला अहवाल अकोली येथे शेतकरी संघटनेने घेतलेल्या तंत्रज्ञान स्वातंत्र भंडारा कार्यक्रमातील एचटीबीटी बियाणे लागवडीचा सविस्तर अहवाल जिल्हास्तरीय जैव तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या स्वाक्षरीने शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शेतकरी संघटनेद्वारे एचटीबीटी कापूस बियाणे लागवड झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ए. जी. वाघमारे, भरारी पथक प्रमुख एम.बी. इंगळे, मोहीम अधिकारी एम.डी. जंजाळ, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एन. एस. लोखंडे यांनी कार्यक्रमस्थळी ललीत बहाळे यांच्या शेतात हे बियाणे न पेरण्याबाबत संघटनेला कळविले होते. तरीही ज्या बियाण्याची लागवड करण्याचा प्रयत्न झाला ते बियाणे संकलित करून त्याचा नमुना तपासणीसाठी नागपूर येथे सीआयसीआरच्या प्रयोगशाळेत पाठवला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com