कुचराई करणाऱ्यांवर नोटिसा बजावणार : खोत
विनोद इंगोले
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

यवतमाळ : कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांच्या दौऱ्यात कृषी विभागाची अकार्यक्षमता आणि खोटारडेपणा चव्हाट्यावर आला. सर्व माहिती घेतल्यावर कृषी सहायक, उपविभागीय कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, महसूल निरीक्षक या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश त्या त्या खात्याच्या वरिष्ठांना त्यांनी दिले आहेत.

यवतमाळ : कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांच्या दौऱ्यात कृषी विभागाची अकार्यक्षमता आणि खोटारडेपणा चव्हाट्यावर आला. सर्व माहिती घेतल्यावर कृषी सहायक, उपविभागीय कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, महसूल निरीक्षक या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश त्या त्या खात्याच्या वरिष्ठांना त्यांनी दिले आहेत.

दीपक मडावी या शेतकऱ्याचा मृत्यू विषबाधेने झाला होता. त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन खोत यांनी केले. सुरक्षात्मक उपाययोजना दुर्लक्षित केल्याची बाब या वेळी त्या कुटुंबीयांनी मान्य केली. दरम्यान, कृषी सहायक गावात येऊन मार्गदर्शन करतो का, असा प्रश्‍न उपस्थित केल्यावर काहींनी होकार दिला.

त्यावर रोजनिशी दाखविण्याचे सांगितल्यावर कृषी सहायक महेश चोडे निरुत्तर झाले. प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी आर. एस. पसलवाड यांची देखील अवस्था तशीच झाली. ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायक येत असल्याची नोंद आहे का, असे ग्रामसेवकाला विचारल्यावर त्याने त्यासाठी कोणतेच रजिस्टरच नसल्याचे सांगितले. त्यामुळे तेथून उठून श्री. खोत यांनी थेट गावातील काही व्यक्‍तींशी संवाद साधला.

त्यातून कृषी सहायक गावात येतच नसल्याचे कळाल्यानंतर त्यांनी कृषी सहायक, उपविभागीय कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, महसूल निरीक्षक या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्या त्या खात्याच्या वरिष्ठांना दिले. विशेष म्हणजे हंगामापूर्वी कीडनाशक फवारणीविषयक मार्गदर्शन करण्याची गरज असताना आता 18 बळी गेल्यावर कृषी विभाग याविषयी भिंत्तिपत्रके छापून जागृती करीत असल्याचेही या ग्रामस्थांनी सांगितले.

कपाशीची केली पाहणी
सेंदूरशनी गावातील भाऊसाहेब वानखडे यांच्या कपाशी पिकाची सदाभाऊ खोत यांनी पाहणी केली. कीड-रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण आजवर चार फवारण्या केल्याचे त्यांनी सांगितले. 30 रुपये प्रति पंप अशी मजुरी दिली जाते आणि फवारणी करणारे मजूर गावात ठराविक असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षात्मक उपाययोजना ते अवलंबीतात की नाही हे शेतीमाल तपासत नाही. औषधी आणून देणे आणि ती योग्य मात्रेत प्रति पंप असावी, हेच आम्ही तपासतो, असे शेतकरी वानखडे यांनी सांगितले.

रक्‍त आणि लघवी तपासणीचे आकारले पैसे
विषबाधेमुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची रक्‍त आणि लघवी तपासण्याची सुविधा शासकीय रुग्णालयात नाही. त्यामुळे या रुग्णांना खासगीतून या चाचण्या कराव्या लागत आहे. तुमच्या तुटपुंज्या मदतीची मेल्यानंतर भीक नको, पण निदान इलाजात तर मदत करा, असे त्या महिलेने सांगितले. या प्रश्‍नाचे उत्तरदेखील सदाभाऊंना देता आले नाही.

साहेब, आमच्या जिल्ह्यात मरण स्वस्त हाये का?
मुंबईत रेल्वे पुलावर मरणाऱ्याला पाच लाखांची मदत त मग यवतमाळात मरणाऱ्याला दोन लाख रुपयांचीच मदत का? म्हणून आम्हाले ती भीक नको ! साहेब, आमच्या जिल्ह्यात मरण स्वस्त हाये का, अशा शब्दांत रुग्णालयात विषबाधेवरील उपचारासाठी दाखल रुग्णाच्या महिला नातेवाइकांनी अशी विचारणा केल्यावर कृषी राज्यमंत्री निरुत्तर झाले.

इतर अॅग्रो विशेष
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारकपुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा...
मसाला उद्याेगातून भारतीताईंनी साधला ’...काळा मसाल्यासोबत शेंगा, कारळा, जवस चटण्यांचे...
गोसंवर्धन, प्रशिक्षण हेच 'गोकुलम...नांदुरा बुद्रुक (जि. अमरावती) येथील गोकुलम...
ज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे....
यवतमाळ जिल्ह्यात शेतमजुरांची होणार...मुंबई : कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे अनेकांचा...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः काेकण, गाेवा, मध्य महाराष्‍ट्र व...
आधुनिक बैलगाडीमुळे होईल बैलांवरील ताण...उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संशोधक डॉ. जयदीप...
कडधान्यांच्या अायातीत वाढ !मुंबई ः कडधान्यांच्या अायातीवर केंद्र सरकारने...
बहाद्दर शेतकऱ्यांचा होणार गौरव पुणे - प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश...
खतांवरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक... नवी दिल्ली ः खतांवरील अनुदान लाभार्थी...
मंगळवारपर्यंत पावसाची शक्‍यता, त्यानंतर...सर्व हवामान स्थिती पाहता ता. १४ ऑक्‍टोबर रोजी...
फवारणीसाठी चार हजार गावांमध्ये संरक्षण...नगर : यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेमुळे झालेल्या...
पावसाळी परिस्थितीत द्राक्ष बागेचे...सध्या काही ठिकाणी द्राक्ष बागेत आगाप छाटणी झालेली...
चवळी, मारवेल, स्टायलाे चारा लागवड...चवळी :  चवळी हे द्विदल वर्गातील...
मूग, उडीद खरेदी केंद्र उद्घाटनाच्या...अकोला : शासन अादेशानुसार नोंदणी केलेल्या...
कृषी सल्ला : पिकांचे नियोजन, कीड व रोग...सद्य परिस्थितीमध्ये पिकांच्या नियोजन व कीड व...
आॅनलाइन नोंदणी अडकली नियमातकोल्हापूर : हमीभाव खरेदी केंद्राबरोबरच अन्य...