agriculture news in Marathi, now cereal deregulation, Maharashtra | Agrowon

आता कडधान्य नियमनमुक्ती
टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 एप्रिल 2018

जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मानेवर बाजार समित्यांचे भूत आहे, तोवर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळणार नाही. त्याचा उत्कर्ष होणार नाही. म्हणून काही झाले तरी शेतकऱ्यांना बाजार समित्यांच्या कचाट्यातून सोडविलेच पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे.
- सदाभाऊ खोत, कृषी व पणन राज्यमंत्री.

मुंबई : भाजीपाला नियमनमुक्त केल्यानंतर आता कडधान्ये, तृणधान्ये आणि तेलबिया नियमनमुक्त करणारच, असा पवित्रा राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या नियमनमुक्ती समितीचा अहवाल लवकरच सरकारला सादर करण्यात येणार आहे. 

शेतकऱ्याला शेतात पिकणारा सर्व शेतीमाल बाजार समितीत आणून विकावा लागत होता. मात्र, सरकारने जुलै २०१६ साली भाजीपाला नियमनमुक्त केल्याने आता भाजीपाला बाजार समितीत न जाता थेट विक्री करणे शेतकऱ्याला शक्य झाले आहे. शेतकऱ्याला अधिक सुलभ व्हावे, यासाठी सरकारने संत सावता माळी थेट भाजीपाला विक्री योजनाही सुरू केली. राज्यात सध्या १३८ आठवडी बाजारांमधून शेतकरी सुमारे दीड ते पावणेदोन हजार टन शेतीमाल विकत आहेत. 

गेल्या वर्षी सुमारे २३० कोटी रुपयांची उलाढाल या माध्यमातून झाल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. याच धर्तीवर शेतकऱ्याला त्याचा शेतीमाल विकण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे यासाठी भाजीपाला नियमनमुक्ती नंतर सरकारने आपला मोर्चा कडधान्ये, तृणधान्ये आणि तेलबियांकडे वळवला आहे. ही धान्येही नियमनमुक्त झाल्यास शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो का? हे तपासण्यासाठी शासनाने कडधान्ये, तृणधान्ये आणि तेलबिया नियमनमुक्तीवर अभ्यास करण्यासाठी समिती नेमली आहे.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह आमदार अनिल बोंडे, संजय केळकर, वालचंद संचेती, आमदार नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे. या समितीमध्ये याबाबत सर्वांगाने चर्चा झाली. मात्र, सर्वपक्षीय आमदारांनी विशेषतः माथाडी कामगारांचे नेते असलेल्या नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे या आमदारांनी या नियमनमुक्तीला कडाडून विरोध केला.

ही नियमनमुक्ती झाल्यास बाजार समितीची फी आणि सुपरव्हिजन फी यांच्यासोबतच माथाडी कामगारांच्या रोजगारावर परिणाम होईल. परिणामी शेकडो माथाडी कामगार बेरोजगार होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. 

भाजीपाला नियमनमुक्तीनंतर शेतकऱ्यांचा झालेला फायदा पाहिला आणि त्यांची बाजार समितीच्या जोखडातून मुक्तता केली, तर त्यांचा अधिक फायदा होतो, असे सरकारचे मत झाले आहे. त्यामुळे आता कडधान्ये, तृणधान्ये आणि तेलबिया नियमनमुक्त करायचे असा निर्धार शासनाने केला असून, तसा अहवाल आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. 
 

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...