पावसाचे दिवस कमी; तीव्रता वाढणार
वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017
कृषी मंत्रालयाच्या पीकपेरणीच्या अाकडेवारीवरून देशात यंदा चांगला पाऊस झाल्याचे दिसून येत अाहे. पीक उत्पादनाचे अंदाजही सकारात्मक अाहेत.
- डॉ. के. जे. रमेश, प्रमुख, भारतीय हवामान विभाग
हैदराबाद ः जागतिक तापमानवाढीमुळे पावसाचे दिवस कमी होत अाहेत; मात्र पावसाची तीव्रता वाढणार अाहे. त्यासाठी भूजलाचा योग्य रीतीने वापर करा, असा सल्ला भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. जे. रमेश यांनी दिला अाहे.
 
भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात अाला. मात्र, प्रत्यक्षात सरासरीच्या ९५ टक्के पावसाची नोंद झाली. ज्याप्रमाणे अंदाज व्यक्त केला होता; त्यानुसार जवळपास तेवढा पाऊस झाला अाहे, असा दावा त्यांनी केला अाहे.
 
देशात यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिले अाहे. कृषी मंत्रालयाच्या पीकपेरणीच्या अाकडेवारीवरून देशात चांगला पाऊस झाल्याचे दिसून येत अाहे. पीक उत्पादनाचे अंदाजही सकारात्मक अाहेत, असे श्री. रमेश यांनी म्हटले अाहे.
 
यंदा देशाच्या सकल अार्थिक उत्पन्नात (जीडीपी) कृषी क्षेत्राचे योगदान राहणार अाहे, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले असल्याचे त्यांनी नमूद केले अाहे. गेल्या वर्षी कर्नाटकमध्ये कमी पाऊस झाला. केरळमध्येही चांगला पाऊस झाला नाही. मात्र, यंदा या राज्यांत अपेक्षित पाऊस झाला असल्याचे ते म्हणाले. 
 
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब अाणि हरियानात कमी पाऊस झाला अाहे. उत्तर पश्चिमी भागातून मॉन्सून माघारी परतला अाहे. मात्र, अद्याप तेलंगणा, अांध्र प्रदेश अाणि कर्नाटकमधून मॉन्सूनच्या माघारी परतण्याचा अंदाज व्यक्त केलेला नाही, असे श्री. रमेश यांनी सांगितले.
 
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...