agriculture news in marathi, The number of villages with water scarcity increased | Agrowon

नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जून 2018

नाशिक : मॉन्सूनचे आगमन होऊनही नाशिक विभागातील टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होण्याऐवजी आणखी वाढली आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यातही विभागातील ३१६ गावे आणि ३५८ वाड्यांवरील ५ लाख ९२ हजार ५६३ नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून २६४ टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे.

नाशिक : मॉन्सूनचे आगमन होऊनही नाशिक विभागातील टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होण्याऐवजी आणखी वाढली आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यातही विभागातील ३१६ गावे आणि ३५८ वाड्यांवरील ५ लाख ९२ हजार ५६३ नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून २६४ टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे.

यंदा मॉन्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांसह प्रशासनाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र नाशिक विभागात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विभागात यंदा पाणीटंचाईनेही कळस गाठला होता. पावसाच्या सरींनंतर पाणीटंचाईची धग कमी होण्याची शक्‍यता होती. मात्र विभागाला या सरींनी हुलकावणी दिल्याने विभागातील पाणीटंचाई ‘जैसे थे’ आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होण्याऐवजी उलट वाढली आहे.

विभागातील जळगाव जिल्ह्यात सर्वांत जास्त १३९ टंचाईग्रस्त गावे असून, या जिल्ह्यात तब्बल २ लाख ५९ हजार ७७ नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यातील १०३ टंचाईग्रस्त गावांतील १ लाख ८२ हजार ३२९ नागरिकांची तहान भागविण्यासाठी ७७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

नगर जिल्ह्यातही ५४ टंचाईग्रस्त गावांतील १ लाख १३ हजार ७०१ नागरिकांना ६२ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा होत आहे. धुळे जिल्ह्यातील १८ गावातील ३७ हजार ७६, तर नंदुरबार जिल्ह्यातील २ गावांतील ३८० नागरिकांना टॅंकर्सद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.

पाणीटंचाईची तीव्रता जास्त असणारे तालुके व गावे
नाशिक : बागलाण (२१), येवला (४२), सिन्नर (१२), मालेगाव (८)
धुळे : शिंदखेडा (१०)
जळगाव : अमळनेर (४८), जामनेर (३४), पारोळा (२७),
चाळीसगाव (११)
नगर : संगमनेर (२१), पारनेर (१०), पाथर्डी (९)

विभागातील टंचाईस्थिती

जिल्हा  टंचाईग्रस्त गावे   वाड्या  टॅंकर्स संख्या    अधिग्रहित विहिरी  लोकसंख्या
नाशिक   १०३  १६५   ७७  ५७  १,८२,३२९
धुळे  १८  ०  १६  ९९   ३७,०७६
नंदुरबार   २   ०   १    ४८      ३८०
जळगाव   १३९  ०   १०८    २२५   २,५९,०७७
नगर ५४  १९३    ६२  २  १,१३,७०१
एकूण  ३१६    ३५८   २६४ ४३१   ५,९२,५६३

 

 

 

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...