agriculture news in marathi, Objective of 63 lakh trees in Satara | Agrowon

साताऱ्यात ६३ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

सातारा : राज्य शासनाच्या ५० कोटी वृक्षलागवड कार्यक्रम या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा तिसरा टप्पा असलेल्या २०१९ मधील पावसाळ्यात ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी बैठक घेतली. या वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी ६३ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. बैठकीस उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संजय पाटील, सहायक वनसंरक्षक संजीवन चव्हाण, जिल्हास्तरीय प्रशासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

सातारा : राज्य शासनाच्या ५० कोटी वृक्षलागवड कार्यक्रम या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा तिसरा टप्पा असलेल्या २०१९ मधील पावसाळ्यात ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी बैठक घेतली. या वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी ६३ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. बैठकीस उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संजय पाटील, सहायक वनसंरक्षक संजीवन चव्हाण, जिल्हास्तरीय प्रशासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमातील उद्दिष्टाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय यंत्रणांकडून तालुकावार रोप वनस्थळांची ओळख करणे आवश्‍यक आहे. जिओटॅग प्रमाणासह (अक्षांश व रेखांश प्रमाणासह) लॅंड बॅंक अहवाल लवकरात लवकर तयार करावेत. जेणेकरून या कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय नियोजनेस गती प्राप्त होईल. लावलेल्या रोपांची अनिवार्यतेने नोंदणी करावी. वृक्षारोपणासाठी आवश्‍यक खड्डे वेळेतच खोदून घ्यावेत. जिल्हास्तरीय प्रशासकीय यंत्रणांना रोप वनस्थळांसाठी जमिनीचा अभाव असल्यास त्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचना सिंघल यांनी दिल्या.

या वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी ६३.०७ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट जिल्हानिहाय, यंत्रणानिहाय व ग्रामपंचायतनिहाय वाटप केले आहे. त्याची माहिती डॉ. हाडा यांनी दिली. हा कार्यक्रम २०१७ मध्ये चार कोटी वृक्षलागवड, २०१८ मध्ये १३ कोटी वृक्षलागवड, तर २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्षलागवड अशाप्रकारे तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. २०१७ मध्ये चार कोटी वृक्षलागवडअंतर्गत जिल्ह्यासाठी सात लाख ६३ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले होते. त्याअनुषंगाने आठ लाख ८८ हजार वृक्षलागवड करण्यात येऊन त्यापैकी जिवंत रोपांचे प्रमाण ८९.४४ टक्‍के आहे, अशी माहिती डॉ. हाडा यांनी दिली.

१५ टक्‍केच वनक्षेत्र
राष्ट्रीय वन नीती १९८८ नुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किमान ३३ टक्‍के क्षेत्र वनाच्छादनाखाली विस्तारित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ऑक्‍टोबर २०१६ मध्ये राज्यभरात ५० कोटी वृक्षलागवड कार्यक्रम सुरू केला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १० हजार ४८४ चौरस किलोमीटर, तर वनक्षेत्र १५६७.६७ चौरस किलोमीटर आहे. हे प्रमाण १४.९५ टक्‍के इतके असून, यात सुमारे १८ टक्‍के वनआच्छादन वाढविण्याची गरज आहे.

इतर बातम्या
जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे...जळगाव ः जिल्ह्यात "मागेल त्याला शेततळे''...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ साधणार...अमरावती ः दुष्काळ, पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर...
दोन्ही शिंदेंना आत्मविश्वास नडला सोलापूर : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या...
नांदगाव तालुक्यात फळबागा वाचविण्यासाठी...नाशिक : नांदगाव तालुक्यातील फळबागा वाचविण्यासाठी...
सांगोला साखर कारखाना राज्य बँकेच्या...सोलापूर : सांगोला सहकारी साखर कारखाना राज्य...
‘कृष्णे’च्या पाणीपातळीत घटसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला पाणीपुरवठा...
अरुणाग्रस्तांचा गाव न सोडण्याचा निर्धारसिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पात पाणीसाठा केला, तरी...
बुलडाण्यात मागणी आल्यास तत्काळ टँकर...बुलडाणा  : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट भीषण...
नांदेड : साडेतेरा हजार हेक्टरवर उन्हाळी...नांदेड : जिल्ह्यात २०१९ च्या उन्हाळी हंगामात १३...
वऱ्हाडात विद्यमान खासदारांनाच पुन्हा...अकोला ः लोकसभा निवडणुकीच्या निकालात गुरुवारी (ता....
पुणे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांकडे...पुणे   ः जिल्ह्यात गळीत हंगाम संपवून...
नाशिकला हेमंत गोडसे रिपीट, तर डॉ. भारती...नाशिक : नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी लोकसभा...
जळगावात कांदा विक्रीत शेतकऱ्यांची लूटजळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन...
जळगावात किसान सन्मान निधीचे वितरण...जळगाव ः खानदेशात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना...
पुणे जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी एक...पुणे  ः यंदा खरीप हंगामात फळबाग लागवड करू...
निविष्ठांची तस्करी रोखण्यासाठी...यवतमाळ ः गेल्या वर्षीच्या अनुभवातून बोध घेत...
नगर, शिर्डीत ‘काँटे की टक्कर’ मतात...नगर ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कामावर...
अकरापैकी सहा आमदारांचा लोकसभेत प्रवेशमुंबई ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात...
पुण्यातील पाणी, वाहतुकीचे प्रश्न...पुणे  ः येत्या पाच वर्षांत पुण्याचा...
निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते...सातारा  ः देशात नरेंद्र मोदी यांच्या...