agriculture news in Marathi, observations are pointed by agri university experts in orange producer belt, Maharashtra | Agrowon

संत्रा पट्ट्यात तज्ज्ञांनी नोंदविली निरीक्षणे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

अमरावती ः संत्रा फळगळीच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी सातपुडा पर्वतरांगातील संत्रा उत्पादकांच्या बागांना भेटी देत त्यांना मार्गदर्शन केले. २८ ऑक्‍टोेबर रोजी या संदर्भाने ‘ॲग्रोवन’मधून वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. 

अमरावती ः संत्रा फळगळीच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी सातपुडा पर्वतरांगातील संत्रा उत्पादकांच्या बागांना भेटी देत त्यांना मार्गदर्शन केले. २८ ऑक्‍टोेबर रोजी या संदर्भाने ‘ॲग्रोवन’मधून वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. 

अमरावती, अकोला जिल्ह्यांत अपुरा पाऊस, धुके, वाढलेले तापमान या कारणांमुळे संत्रा फळांची गळ होत आहे. २० लाख रुपयांत झालेल्या सौद्यापोटी केवळ २ ते ३ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले जात आहेत. यामुळे सुमारे ८५ कोटी रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा दावा अचलपूर परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. येथील मधुकर नाकट यांनीही नुकसान झाल्याचे सांगितले. 

याविषयी सविस्तर वृत्त ‘ॲग्रोवन’मधून २८ ऑक्‍टोबर रोजी प्रकाशित झाले होते. त्याची दखल घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (फळे) विभागाचे तज्ज्ञ डॉ. दिनेश पैठकर, डॉ. योगेश इंगळे, डॉ. उज्ज्वल राऊत यांनी संत्रा बागा असलेल्या अकोट (जि. अकोला) तालुक्‍याचा दौरा केला. सध्या फळगळ कमी असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. पाऊस नसल्यामुळे या वेळी कोळशीचा प्रादुर्भाव झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अन्नद्रव्य तयार करण्याची झाडाची क्रिया मंदावते. १५ ऑक्‍टोबरपर्यंत आंबिया बहारातील फळे निघणे अपेक्षित राहते; परंतु वातावरणामुळे फळधारणा या वर्षी उशिरा झाली. त्यासोबतच फळांना रंग येण्यासाठीदेखील संत्रा उत्पादक जास्त दिवस फळे झाडावर ठेवतात, असेही निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले. 

कृषी विद्यापीठाच्या वतीने मेळावे घेतले जावेत, अशी इच्छा शेतकऱ्यांनी  व्यक्‍त केली. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपस्थित तज्ज्ञांनी फेब्रुवारीत अशा प्रकारचा मेळावा घेतला जाईल, असे सांगितले.

इतर बातम्या
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...पुणे : राज्यात विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...