agriculture news in Marathi, obstacles in cereals purchasing on MSP purchasing centers in jalgaon district, Maharashtra | Agrowon

जळगावात भरडधान्य खरेदी केंद्रांवरही नियमांचा अडथळा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

जळगाव  ः जिल्ह्यात भरडधान्य खरेदी केंद्र आठ दिवसांपूर्वी सुरू केले; मात्र खरेदीत ॲपद्वारे नोंदणीच्या अडचणी, गोदामे उपलब्ध न होणे अशा अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे या केंद्रांवर अद्याप एक दाणाही धान्य खरेदी होऊ शकलेली नाही. 

जिल्ह्यात मागील महिन्यात १५ भरडधान्य खरेदी केंद्रे मार्केटिंग फेडरेशनने सुरू केली; पण यापैकी एकाही केंद्रावर एक दाणाही आठवडाभरात आला नाही. संबंधित तालुक्‍यांमधील सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघ सबएजंट म्हणून हे केंद्रे चालवत आहेत. 

जळगाव  ः जिल्ह्यात भरडधान्य खरेदी केंद्र आठ दिवसांपूर्वी सुरू केले; मात्र खरेदीत ॲपद्वारे नोंदणीच्या अडचणी, गोदामे उपलब्ध न होणे अशा अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे या केंद्रांवर अद्याप एक दाणाही धान्य खरेदी होऊ शकलेली नाही. 

जिल्ह्यात मागील महिन्यात १५ भरडधान्य खरेदी केंद्रे मार्केटिंग फेडरेशनने सुरू केली; पण यापैकी एकाही केंद्रावर एक दाणाही आठवडाभरात आला नाही. संबंधित तालुक्‍यांमधील सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघ सबएजंट म्हणून हे केंद्रे चालवत आहेत. 

केंद्रात ऑनलाइन नोंदणीशिवाय शेतमाल खरेदी होणार नाही. या नोंदणीसाठी संबंधित केंद्रातील व्यवस्थापकांच्या स्मार्ट फोनमध्ये नोंदणी ॲप डाउनलोड करायचे आहे. एका खासगी कंपनीने ते ॲप दिले असून, ते मागील आठवड्यात अनेक व्यवस्थापकांनी डाउनलोड केले. सोमवारीही (ता. ६) त्यासंबंधीचे कामकाज काही ठिकाणी सुरू होते. हे ॲप हाताळणीबाबत व्यवस्थापकांना अडचणी येतात. अनेक जण तंत्रस्नेही (टेक्‍नोसॅव्ही) नसल्याने अडचणी अधिक आहेत. त्यामुळे नोंदणी करता येत नाही. जे शेतकरी येतात, त्यांना परतावून लावले जात असल्याची माहिती मिळाली.

गोदामांची अडचण
खरेदी केंद्रात येणारा माल साठवणुकीसाठी वखार महामंडळ व इतर सहकारी संस्थांची गोदामे काही शेतकरी संघांना अजूनही उपलब्ध झालेली नाही. जळगाव, चोपडा येथेही समस्या आहेत. संबंधित तालुका तहसील प्रशासनाकडून ही गोदामे उपलब्ध करून घेण्याचे आदेश मार्केटिंग फेडरेशनने दिले आहेत. गोदामे नसल्याने काही ठिकाणी खरेदी सुरू झालेली नसल्याचे सांगण्यात आले. 

एफएक्‍यूचा जाच
शेतमालात १४ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आर्द्रता नको, माती, कचरा नको, अशा अनेक अटी दर्जेदार (एफएक्‍यू) मालासंबंधी केंद्रांवर आहेत. असा माल शेतकऱ्यांकडे यंदा फारसा नाही. अर्थातच पाऊस नव्हता तेव्हा व नंतर परतीच्या पावसात ज्वारी, बाजरीला फटका बसला. तसेच माल विक्रीपूर्वी नोंदणी करताना आधार क्रमांक, बॅंक खाते क्रमांक, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक मागितला जात आहे. अनेक वृद्ध शेतकऱ्यांचे आधार क्रमांक लिंक होत नसल्याने अडचणी अधिकच्या येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

इतर अॅग्रो विशेष
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...