जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
ताज्या घडामोडी
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम गूळ व ऊस हंगामावर झाला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात चांगला पाऊस झाल्याने तोडी काही काळ रोखण्याची वेळ आली. तर गुऱ्हाळघरांनीही आदणांची संख्या कमी केली. समुद्रात झालेल्या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील हवामानही ढगाळ व पावसाळी झाल्याने हंगामात व्यत्यय आला.

करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेकडो गुऱ्हाळे रात्रभर बंद ठेवली होती. तसेच जोरदार पाऊस येईल या भीतीने अनेक गुऱ्हाळघरचालकांना गुऱ्हाळासाठी लागणारी सरपण झाकून ठेवावे लागले. चक्रीवादळामुळे सर्वत्रच ढगाळ हवामान अद्यापही आहे. कोकण किनारपट्टीनजीक असणाऱ्या तालुक्यांमध्ये दोन दिवसांपासून थांबून थांबून हलका पाऊस सुरू आहे. यामुळे वाफसा स्थिती जाऊन शेत ओलसर झाल्याने उसाची वाहतूक करणे अशक्य झाल्याने कारखान्यांनी काही काळ तोडी बंद ठेवल्या.
चांगल्या रस्त्यावर ज्या शेतकऱ्यांचे ऊस प्लॉट आहेत, अशा प्लॉटना प्राधान्य देण्याचे काम पश्चिम भागातील काही कारखान्यांचे प्रतिनिधी करत असल्याचे चित्र होते. गगनबावडा, शाहूवाडी व राधानगरी परिसरात काहीसा दमदार तर हातकणंगले, शिरोळ तालुक्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस दोन दिवसांपूर्वी झाला. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी (ता. 6) हवामान चांगले असल्याने व काही काळ सूर्यप्रकाश असल्याने ऊस तोडणी विना व्यत्यय सुरू राहील, अशी शक्यता कारखानदारांनी व्यक्त केली.
- 1 of 348
- ››