agriculture news in Marathi, Obstacles in tur registration work in Parbhani, Maharashtra | Agrowon

आॅनलाइन तूर नोंदणीच्या कामात अडथळे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जानेवारी 2018

परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तूर नोंदणीसाठी संकेतस्थळ बंद राहू लागल्याने अडथळे येत आहेत. नोंदणीचे काम गतीने होत नाही. शुक्रवार(ता. १२)पर्यंत नांदेड जिल्ह्यात तीन हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून परभणी, हिंगोली जिल्ह्यांत नोंदणीस सुरवात झाली.

परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तूर नोंदणीसाठी संकेतस्थळ बंद राहू लागल्याने अडथळे येत आहेत. नोंदणीचे काम गतीने होत नाही. शुक्रवार(ता. १२)पर्यंत नांदेड जिल्ह्यात तीन हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून परभणी, हिंगोली जिल्ह्यांत नोंदणीस सुरवात झाली.

कृषी विभागाकडून यंदाच्या हंगामातील हेक्टरी तूर उत्पादकतेची माहिती उपलब्ध झालेली नाही, तसेच खरेदीचे आदेशही प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे खरेदी केंद्र कार्यान्वित झाले नाहीत. परंतु नवीन तुरीची आवक सुरू झाली असून खुल्या बाजारामध्ये आधारभूत किमतीपेक्षा १००० ते २००० रुपये कमी दराने खरेदी करून व्यापारी लूट करत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासकीय खरेदी केंद्रांवर तूर आणण्यापूर्वी आॅनलाइन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, बिलोली, धर्माबाद, नांदेड, लोहा, भोकर, हदगाव येथे खरेदी विक्री संघामार्फत नायगाव आणि किनवट येथे बाजार समितीमार्फत नोंदणी सुरू आहे. शुक्रवार(ता. १२)पर्यंत तीन हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. 
परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, गंगाखेड, पूर्णा या सात ठिकाणी, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, जवळा बाजार, कळमनुरी, सेनगाव या पाच ठिकाणी तूर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यासाठी वेळ लागत आहे. संकेतस्थळ वारंवार बंद राहू लागल्याने नोंदणीच्या कामास विलंब लागत आहे.

आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ५ हजार ४५० रुपये असताना व्यापारी मात्र ३ हजार ५०० ते ४४०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करत आहेत. सध्या खुल्या बाजारात लाल तुरीची ३ हजार ९०० ते ४ हजार ४०० रुपये, पांढऱ्या तुरीची ३ हजार ९५० रुपये ते ४ हजार ३८० रुपये, काळ्या तुरीची ३ हजार ५५० रुपये दराने खरेदी केली जात आहे. नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू नाहीत. 

इतर बातम्या
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
बफर स्टॉकच्या शक्‍यतेने साखर १००...कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या...
दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्कोपुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
कापूस बियाणे सत्यता पडताळण्यासाठी ‘क्‍...जळगाव ः बोगस कापूस बियाण्याला आळा घालण्यासह...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...