Agriculture News in Marathi, Ockhi cyclone devastates coastal belt in Tamil Nadu, Kerala, India | Agrowon

ओखी चक्रीवादळामुळे केरळ, तमिळनाडूत नुकसान
वृत्तसेवा
शनिवार, 2 डिसेंबर 2017

चेन्नई, तमिळनाडू  ः ओखी चक्रीवादळाचा दक्षिण भारतातील किनारपट्टी भागाला मोठा तडाखा बसला अाहे. या वादळामुळे तमिळनाडूसह केरळमधील किनारी भागात मोठे नुकसान झाले अाहे. या वादळामुळे अातापर्यंत दोन्ही राज्यांतील ९ जणांचा मृत्यू झाला अाहे. हे चक्रीवादळ शुक्रवारी (ता. १) केरळ अाणि लक्षद्वीप बेटाच्या दिशेने सरकले. पुढील चोवीस तासांत या चक्रीवादळाची तीव्रता वाढणार अाहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला अाहे.

चेन्नई, तमिळनाडू  ः ओखी चक्रीवादळाचा दक्षिण भारतातील किनारपट्टी भागाला मोठा तडाखा बसला अाहे. या वादळामुळे तमिळनाडूसह केरळमधील किनारी भागात मोठे नुकसान झाले अाहे. या वादळामुळे अातापर्यंत दोन्ही राज्यांतील ९ जणांचा मृत्यू झाला अाहे. हे चक्रीवादळ शुक्रवारी (ता. १) केरळ अाणि लक्षद्वीप बेटाच्या दिशेने सरकले. पुढील चोवीस तासांत या चक्रीवादळाची तीव्रता वाढणार अाहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला अाहे.

ओखी चक्रीवादळामुळे तमिळनाडूतील किनारी पट्ट्यात जोरदार पाऊस पडत अाहे. यामुळे कन्याकुमारी, तिरुनेलवेल्ली जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली अाहे. तसेच या भागात झाडांची पडझड झाली असून, अनेक वीज खांब कोसळले अाहेत.
बंगालच्या उपसागरात बुधवारी (ता. २९) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यानंतर गुरुवारी (ता. ३०) हा कमी दाबाचा पट्टा अधिकच तीव्र झाल्याने त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले.

ओखी चक्रीवादळामुळे केरळ, तमिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर तमिळनाडूतील चेन्नई, कांचीपुरम, दिंडीगुल, कन्याकुमारी, तुतीकोरीन, थेनी अादींसह १३ जिल्ह्यांतील शाळांना सुटी देण्यात अाली अाहे.

ओखी चक्रीवादळ अरबी समुद्रातील दक्षिणपूर्व भागात पोचले असून, ते पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकत अाहे. हे सध्या लक्षद्वीपमधील मिनिकॉयपासून ११० किलोमीटरवर अाणि अमिनी दिवी बेटापासून दक्षिण पूर्व दिशेला २९० किलोमीटर अंतरावर अाहे. हे वादळ पुढील २४ तासांत लक्षद्वीपच्या दिशेने सरकणार अाहे. तसेच या वादळामुळे पुढील १२ तासांत तमिळनाडूत जोरदार पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले अाहे.

केरळमधील शेकडो मच्छीमार समुद्रात अडकले
ओखी चक्रीवादळामुळे केरळमधील शेकडो मच्छीमार समुद्रात अडकले अाहेत. भारतीय नौदल, हवाई दल अाणि तटरक्षक दलांकडून केरळमधील किनारी भागात मच्छीमारांचा शोध सुरू अाहे. अातापर्यंत ७० मच्छीमारांशी संपर्क साधला अाहे. मच्छीमारांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू अाहेत, असे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी म्हटले अाहे.

चक्रीवादळामुळे दक्षिण केरळ भागातील चार जणांचा मृत्यू झाला अाहे. येथे मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली अाहेत. यामुळे वाहतूक ठप्प झाली अाहे.

इतर ताज्या घडामोडी
सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकलासांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९०...
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी...नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार...औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील...
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवारनगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन...
सिंचनाच्या पाण्याचे मोजमाप करण्याच्या...शेतीमध्ये पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून,...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल १००० ते २५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मतदान केंद्रावरील रांगेपेक्षा...सोलापूर  : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र...
अवकाळीचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटकासोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-...
मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसानमंठा, जि. जालना  : तालुक्यात मंगळवारी ( ता....
पुणे विभागातील दोन लाख हेक्टरवरील ऊस...पुणे  ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पुणे...
मराठवाड्यातील मतदान टक्केवारीत किंचित घटबीड, परभणी : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद,...
सातारा जिल्‍ह्यातील ऊस उत्पादकांना...सातारा  ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा...
म्हैसाळ योजनेत २२ पंपांद्वारे उपसासांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांची संख्या विक्रमी...
दिग्गजांच्या सभांनी तापणार साताऱ्यातील...सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय...
प्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदारमुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ४००ते २०००...नाशिकला काकडी प्रतिक्विंटल १२५० ते १७५० रुपये...
धनगर समाज भाजपच्याच पाठीशी ः महादेव...सांगली  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच...
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...