agriculture news in marathi, ockhi cyclone heats konkan | Agrowon

अोखी चक्रीवादळाने समुद्रात लाटांचे तांडव, पावसाचा तडाखा
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

मुंबई - अरबी समुद्रात तयार झालेल्या ओखी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे काल सायंकाळी मुंबईसह नजीकच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याचा जोर आज (ता. 5) वाढून मुसळधार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. पालघर, रायगड, ठाण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांतही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर ओखी धडकत असताना त्याची तीव्रता कमी होत असली तरीही किनारपट्टी भागांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई किनारपट्टीवर ताशी सत्तर किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

मुंबई - अरबी समुद्रात तयार झालेल्या ओखी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे काल सायंकाळी मुंबईसह नजीकच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याचा जोर आज (ता. 5) वाढून मुसळधार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. पालघर, रायगड, ठाण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांतही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर ओखी धडकत असताना त्याची तीव्रता कमी होत असली तरीही किनारपट्टी भागांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई किनारपट्टीवर ताशी सत्तर किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. पृष्ठभागांवरही ताशी 35 किलोमीटर वेगाने वारे वाहतील.

भरतीमुळे मंगळवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास चक्रीवादळामुळे सहा मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे; तर दुपारी 12.45 वाजता पुन्हा भरती येणार असल्याने त्या वेळीही लाटांची उंची वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मुंबईतील शिवाजी पार्क, वरळी सी लिंक, वांद्रे, मरीन लाइन्ससह कोकणातील किनारपट्टी भागात समुद्राचे पाणी शिरण्याची भीती आहे. 

काही भागांत वाऱ्याच्या वाढलेल्या वेगामुळे झाडे मोडण्याची शक्‍यता आहे. या काळात हवेची गुणवत्ता खालावण्याची शक्‍यताही मुंबई सफर या प्रकल्पाचे अधिकारी डॉ. गुफ्रान बॅग यांनी व्यक्त केली. 

मच्छीमारांना मनाई 
केंद्रीय वेधशाळेच्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री ओखी वादळाचे सुरत किनारपट्टीनजीकच्या भागांत तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होईल. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबई  किनारपट्टीवरील मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली. सतर्कतेचा इशारा म्हणून पालिका आपत्कालीन विभागासासह तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्तीकालीन निवारण दल सज्ज झाले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...