ऑक्टोबर हीटमुळे पुरवठा घटला, ब्रॉयलर्स तेजीत

ऑक्टोबर हीटमुळे पुरवठा घटला, ब्रॉयलर्स तेजीत
ऑक्टोबर हीटमुळे पुरवठा घटला, ब्रॉयलर्स तेजीत

मागणीच्या प्रमाणात योग्य पुरवठा आणि त्यातच ऑक्टोबर हीटमुळे वजनरूपी उत्पादन घटल्याने ब्रॉयलर्स बाजार चमकला. मागील पंधरा दिवसांत प्रतिकिलो तब्बल २८ रु. सुधारणा झाली आहे.

नाशिक विभागात शनिवारी (ता. २९) रोजी ८० रु. प्रतिकिलो दराने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. गेल्या पंधरवड्यात ब्रॉयलर्स रेट्समध्ये प्रतिकिलो तब्बल २८ रु. सुधारणा झाली आहे. महाराष्ट्रात श्रावण संपल्यानंतर ब्रॉयलर्सच्या मागणीत जोरदार सुधारणा झाल्याने तत्काळ बाजारभाव वधारले होते. गणपती उत्सव काळात संतुलित पुरवठा झाल्यामुळेही बाजाराचा कल वरच्या दिशेकडे सरकला.

खडकेश्वरा हॅचरिजचे संचालक संजय नळगीकर यांनी सांगितले, की मागील पंधरा दिवसांत ब्रॉयलर पक्ष्यांचा जोरदार खप झाला आहे. गुजरात, राजस्थान आणि एकूणच उत्तर भारतातील ब्रॉयलर्सचे रेट वधारले आहेत. मागील शेजारी राज्यातून आधार मिळाल्याने बाजारभाव सुधारले. सद्यःस्थितीत सातत्याने विक्री करत राहणे आणि पक्ष्यांची वजने नियंत्रणात ठेवणे हे बाजारासाठी चांगले राहील. शनिवारी (ता. ३०) जोरदार लिफ्टिंग झाले. अपेक्षित उद्दिष्टानुसार मालविक्री झाली. सप्ताहअखेरमुळे रिटेल व हॉटेल्सकडील मागणी चांगली वाढ दिसली. यापुढे, नवरात्र कालावधीत १० ते १७ ऑक्टोबरदरम्यान संतुलित उत्पादन नियोजनाचा प्रभाव दिसेल. सध्या दिवाळीदरम्यान येणारे प्लेसमेंट सुरू होईल. त्यामुळे चिक्सचे दरात वाढ झाली आहे.

कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, की संतुलित पुरवठ्याच्या नियोजनामुळे गेल्या पंधरवड्यात ब्रॉयलर्स मार्केटच्या बाजारभावात खालील पातळीवरून जोरदार सुधारणा झाली. पोल्ट्री शेड्समध्ये कमी वजनाचे पक्षी होते. त्यातच किरकोळ मागणीत जोरदार सुधारणा झालीय.

नाशिकस्थित इंटिग्रेटर डॉ. सीताराम शिंदे म्हणाले, की शेजारी राज्यांतील बाजारभाव फारसे पुरक नसले तरी सध्याच्या उष्णतेमुळे महाराष्ट्रातील बाजारभाव सध्याच्या पातळीवर स्थिरावण्याची अपेक्षा आहे. उष्णतेमुळे पक्ष्यांची वजने वाढत नाहीत. सव्वा दोन किलोच्या आत वजन मिळत आहेत. सरासरी विक्रीयोग्य साईज २.१ किलो किंवा जास्तीत जास्त २.३ किलो आहे. मागील आठवड्यात अनपेक्षितपणे बाजार उंचावल्याने शेतकऱ्यांनी विक्रीची संधी साधली. या प्रक्रियेत संस्थात्मक क्षेत्राकडून पुरवठाविषयक योग्य उत्पादन नियोजनामुळे बाजाराला मोठा हातभार लागला आहे.

पुणे विभागात २९ रोजी ३६४ रु. प्रतिशेकडा दराने अंड्याचे लिफ्टिंग झाले. सप्टेंबर महिन्यात ३५० रु. प्रतिशेकडाच्या दरम्यान सरासरी विक्री दर मिळाला. श्रावण आणि गणपती काळातील सरासरी विक्री दर उत्पादन खर्चाच्या खाली गेला नाही, ही जमेची बाजू ठरली आहे. महाराष्ट्रात लहान मोठ्या लेअर युनिट्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शेजारी राज्यातील आवकेला स्पर्धा निर्माण झाल्याचे दिसते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com