निफाडमध्ये द्राक्षबागांच्या ऑक्‍टोबर छाटणीला वेग

द्राक्षबागांच्या आॅक्टोबर छाटणीला सुरुवात
द्राक्षबागांच्या आॅक्टोबर छाटणीला सुरुवात
निफाड, जि. नाशिक  : निफाड तालुक्‍यातील द्राक्षपंढरी असलेल्या उगाव, शिवडी, खेडे, वनसगाव, सोनेवाडी, सारोळे, खडकमाळेगाव, सावरगाव, रानवड भागात द्राक्षबागांच्या ऑक्‍टोबर छाटणीला वेग आला आहे. गुजरातमधील डांगसह पेठ, सुरगाणा, दिंडोरी भागातील शेतमजूर यासाठी येथे दाखल झाले आहेत. 
 
गेल्या हंगामात अत्यल्प बाजारभाव मिळाल्याने उशिराने द्राक्षमाल काढण्यात आला. खरड छाटणीनंतर फुटव्यातून निघालेल्या नवीन काड्यांची कमी वेळेत गर्भधारणा झाली नाही. काडी अपरिपक्व राहिली. त्यातच गेल्या महिनाभरापासून पावसाने द्राक्ष उत्पादकांची चांगलीच तारांबळ केली. त्यामुळे शेतकऱ्यांना गोडा बहर (फळबहार) छाटणी सुरू करता आली नाही.
 
हवामान कोरडे झाल्याने अनेक द्राक्ष उत्पादकांनी नवरात्रीचा मुहूर्त साधत छाटणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे द्राक्षपंढरीत ही कामे करण्यासाठी मजूर दाखल झाले आहेत. द्राक्ष बागायतदार शेतकरीही गटागटाने या कामगारांकडून द्राक्षबागेची छाटणी, पेस्टिंग, थिनिंग, डिपिंग आदी कामे करून घेत आहेत. त्यासाठी काही भागांत शेतकरी व कामगार करार करत आहेत.
 
द्राक्षवेलींची चांगली वाढ होण्यासाठी सध्या शेतकरी खतमात्रा देत आहेत; तसेच कीडरोग नियंत्रणासाठी शिफारशीनुसार कीडनाशकांच्या फवारण्यादेखील सुरू आहेत. छाटणी करून त्यावर पेस्टिंग करण्यासाठी एकरी ३५०० ते ५००० रुपये; तर फेलफूट काढणे व डिपिंग करणे आदी कामांसाठी १५०० ते ३००० रुपये मजुरी दर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com