agriculture news in marathi, odd weather affects on millet crop, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात हवामानाचा बाजरी उगवणीवर परिणाम
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

जळगाव  ः जिल्ह्यात बाजरीची पेरणी काही भागांचा अपवाद वगळता पूर्ण झाली आहे. परंतु यंदाच्या विषम वातावरणाचा फटका बाजरीला बसला असून, अनेक ठिकाणी पिकात तूट आली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जळगाव  ः जिल्ह्यात बाजरीची पेरणी काही भागांचा अपवाद वगळता पूर्ण झाली आहे. परंतु यंदाच्या विषम वातावरणाचा फटका बाजरीला बसला असून, अनेक ठिकाणी पिकात तूट आली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यंदा अनेक शेतकऱ्यांनी कापसाचे पीक काढून क्षेत्र रिकामे केले. ते सुमारे महिनाभर रिकामे ठेवले आणि जानेवारीच्या अखेरीस बाजरीची पेरणी केली. काही शेतकऱ्यांनी २० ते २५ जानेवारीदरम्यानही पेरणी केली. जानेवारी महिन्याच्या मध्यात व शेवटच्या टप्प्यात ज्या बाजरीची पेरणी झाली, तिच्या उगवणीवर अनेक ठिकाणी परिणाम झाल्याचे चित्र आहे. काही शेतकऱ्यांचे पीक तर फक्त ३० ते ३५ टक्केच उगवले आहे. यामुळे पीक मोडण्याची वेळही आली.

जिल्ह्यात चोपडा, चाळीसगाव, पारोळा, पाचोरा, जामनेर, भडगाव या भागांत बाजरीची पेरणी अधिक झाली आहे. पेरणी यंदा बऱ्यापैकी झाली. कारण कापसाचे पीक गुलाबी बोंड अळीने काढण्याची प्रक्रिया डिसेंबर व जानेवारी महिन्यांत अनेक शेतकऱ्यांनी केली. हरभरा व गहू पेरणीऐवजी शेतकऱ्यांनी बाजरीला पसंती दिली. ज्या कापसाच्या क्षेत्रात ठिबक यंत्रणा होती, त्या क्षेत्रात ठिबक यंत्रणा तशीच ठेऊन ठिबकद्वारे बाजरीचे सिंचन केले.

बाजरीच्या पिकाला किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअस पुढे हवे असते, परंतु मागील महिनाभरात १५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान झालेच नाही. यातच २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी यादरम्यान ढगाळ वातावरण होते. दिवसाही आर्द्रतायुक्त थंड वारे वाहत होते. हवी तशी उष्णता बाजरीच्या पेरलेल्या बियाण्याला मिळाली नाही.

हवामान प्रतिकूल असल्याने बाजरीची ८० टक्के उगवणशक्ती मिळविणे शेतकऱ्यांना अशक्‍य झाले. काळ्या कसदार जमिनीत उगवणीवर अधिकचा परिणाम झालेला आहे, असे शेतकरी मंगल पाटील (वडनगरी, जि. जळगाव) यांनी म्हटले आहे.

बाजरीच्या पिकाबाबत असमाधानकारक स्थिती असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. काही शेतकऱ्यांनी पिकात तूट आलेली असतानाही ते तसेच ठेवले असून, जे धान्य व चारा मिळेल, त्यावर समाधान मानन्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही, अशी स्थिती आहे.

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...