agriculture news in marathi, Offer a tanker before the scarcity is increased | Agrowon

टंचाई वाढण्यापूर्वी टॅंकरचे प्रस्ताव मागवा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

सोलापूर : जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक तालुक्‍यांत पुरेसा पाऊस नसल्याने टंचाईची तीव्रता वाढत जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर संभाव्य टंचाई विचारात घेऊन टॅंकर मागणीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत कृषी सभापती मल्लिकार्जून पाटील यांनी केली.

सोलापूर : जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक तालुक्‍यांत पुरेसा पाऊस नसल्याने टंचाईची तीव्रता वाढत जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर संभाव्य टंचाई विचारात घेऊन टॅंकर मागणीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत कृषी सभापती मल्लिकार्जून पाटील यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची बैठक सभापती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. परतीच्या पावसाचे अवघे १० ते १५ दिवस उरले आहेत. पण अद्याप पाऊस झालेला नाही. परिणामी, जिल्ह्यातील भूजलपातळी हवी तशी वाढलेली नाही. मध्यम व लघु प्रकल्पांसह अनेक गावांमधील पाझर तलावांमध्ये पाणीसाठा झालेला नाही. पावसाची अशीच स्थिती राहिल्यास ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्‍यता असल्याने संभाव्य टंचाई विचारात घेऊन टॅंकर मागणीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या, या वेळी काही सदस्यांनीही आपल्या सूचना मांडल्या.

सभापती पाटील म्हणाले, "पावसाने ओढ दिल्याने बहुतांश पिके वाया गेली. उजनी धरण शंभर टक्के भरले. पण, जिल्ह्यातील मध्यम, लघू प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झालेला नाही. अनेक गावांतील पाझर तलाव कोरडे आहेत. धरणातून पाणी सोडल्याने नदी व कालवा काठावरील भूजलपातळीत थोडाफार बदल झाला आहे. पण, जिल्ह्यातील काही ठरावीक भागालाच त्याचा लाभ होणार आहे. अन्य भागात विहिरी, कुपनलिकांना अद्याप मुबलक पाणी नाही.``

संभाव्य पाणी टंचाईची शक्‍यता लक्षात घेऊन टॅंकरचे प्रस्ताव मागवा, अशा सूचना कार्यकारी अभियंत्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. ‘‘पीककापणी प्रयोगावरून पीकविमा नुकसानभरपाई ठरविण्यात येते. पण, ठरविण्याची पद्धत चुकीची असून तीन वर्षांच्या सरासरी उत्पन्नानुसार ती ठरविण्यात येते, हे निकष चुकीचे आहेत,'''' असेही ते म्हणाले. या वेळी विविध मुद्यांसह कामकाजाचा आढावा घेतला.

इतर बातम्या
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...