agriculture news in Marathi, officers got promotion, Maharashtra | Agrowon

कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण अनेकांना खुर्च्या सोडवेनात
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 मार्च 2019

पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ कृषी अधिकारीपदी पदोन्नती दिली. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये पदोन्नतीच्या जागी पर्यवेक्षक हजरच झालेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

“पदोन्नती देताना बहुतेकांच्या बदल्या विदर्भात तसेच मराठवाड्यात करण्यात आलेल्या आहेत. अनेक हजर न झाल्यामुळे तसेच काही जिल्ह्यांमध्ये हजर होऊन रजेवर जाण्याचे प्रकार घडल्यामुळे समस्या तयार झालेल्या आहेत. संबंधित सहसंचालकांना या प्रकरणात लक्ष घालण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत, अशी माहिती आस्थापना विभागाच्या सूत्रांनी दिली. 

पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ कृषी अधिकारीपदी पदोन्नती दिली. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये पदोन्नतीच्या जागी पर्यवेक्षक हजरच झालेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

“पदोन्नती देताना बहुतेकांच्या बदल्या विदर्भात तसेच मराठवाड्यात करण्यात आलेल्या आहेत. अनेक हजर न झाल्यामुळे तसेच काही जिल्ह्यांमध्ये हजर होऊन रजेवर जाण्याचे प्रकार घडल्यामुळे समस्या तयार झालेल्या आहेत. संबंधित सहसंचालकांना या प्रकरणात लक्ष घालण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत, अशी माहिती आस्थापना विभागाच्या सूत्रांनी दिली. 

महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटनेकडून पदोन्नतीसाठी अनेक वर्ष पाठपुरावा केला. शासनाने हा प्रश्न निकालात काढला. पण ५० टक्के कृषी पर्यवेक्षक पदोन्नतीच्या ठिकाणी हजर झालेलेच नाहीत. सहसंचालकांनी सांगून देखील नव्या जागेवर पर्यवेक्षक हजर होत नसल्यामुळे या प्रकरणात प्रशासनाचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होते. ऐन दुष्काळात यामुळे काही तालुक्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता तयार झाली आहे, असे कर्मचारी सांगतात. 

“भरपूर पगार, याशिवाय मोक्याच्या पदावर कामे, गावाजवळ किंवा शहराजवळ पोस्टिंग अशा सुविधा काही क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना हव्या असतात. त्यामुळे कृषी सल्ला आणि योजनांची माहिती गावागावात पोचण्याकडे दुर्लक्ष होते. अधिकाऱ्यांनाही अशा कर्मचाऱ्यांना वेसन घालता येत नाही. कारण, अधिकारी वर्गही तेच करतो आहे,’’ अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

किती जणांना पदोन्नती मिळाली, किती जण हजर झाले, किती जणांनी पदोन्नत्या नाकारल्या याचीदेखील माहिती सध्या आस्थापना विभागाकडे नाही. पदोन्नती रद्द करून नव्या कर्मचाऱ्यांना संधी देण्याची द्यावी, असे काही पर्यवेक्षकांचे म्हणणे आहे. 

स्पष्ट आदेश नसल्याने होतेय दुर्लक्ष
पदोन्नतीवर बदली होऊनदेखील अद्याप कार्यमुक्त न केलेल्या कर्मचाऱ्यांना आदेश निघाल्याच्या तारखेपासून मानीव कार्यमुक्त करावे, असा स्पष्ट आदेश आयुक्तालयाने न दिल्यामुळे अडचण तयार झालेली आहे. कार्यमुक्त न केलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन संबंधित वरिष्ठांकडून वसूल करण्याचे धोरण ठेवल्यास हा प्रश्न सुटू शकतो. तत्कालीन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी तशी भूमिका घेतली होती. बदली झालेल्या अधिकाऱ्याचे वेतन (जुन्या) कार्यालयाने करू नये. असे वेतन काढल्यास संबंधित नियंत्रण अधिकाऱ्याच्या वेतनातून या रकमेची वसुली करावी. कृषी अधिकऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त न करणाऱ्या वरिष्ठ अधिकऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेश श्री. सिंह यांनी काढले होते.

इतर अॅग्रो विशेष
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...