agriculture news in marathi, officials Avoid to of cotton seeds purchase Receipt | Agrowon

कापूस बियाणे खरेदीची पावती घेण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 जानेवारी 2018

सांगली : मिरज तालुक्‍याच्या पूर्व भागातील खटाव गावातील कापसावर बोंड अळीने प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राचे कृषी विभागाने पंचनामे करून पंधरा दिवस झाले. ज्या कृषी निविष्ठा खरेदी केंद्रातून कापसाचे बियाणे खरेदी केले, त्याची पावती कृषी अधिकाऱ्यांना द्या, अशी नोटीस कृषी विभागाने पाठविली. मात्र शेतकऱ्यांकडील पावती घेण्यास कृषी विभागाचे अधिकरी टाळाटाळ करत आहेत.

सांगली : मिरज तालुक्‍याच्या पूर्व भागातील खटाव गावातील कापसावर बोंड अळीने प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राचे कृषी विभागाने पंचनामे करून पंधरा दिवस झाले. ज्या कृषी निविष्ठा खरेदी केंद्रातून कापसाचे बियाणे खरेदी केले, त्याची पावती कृषी अधिकाऱ्यांना द्या, अशी नोटीस कृषी विभागाने पाठविली. मात्र शेतकऱ्यांकडील पावती घेण्यास कृषी विभागाचे अधिकरी टाळाटाळ करत आहेत.

शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क केला असता मी रजेवर आहे, आज मीटिंग आहे, अशी उत्तरे देऊ लागले आहे. पंचनामे केलेला अहवाल अद्यापही कृषी आयुक्तालयामध्ये सादरच केलेला नाही. यामुळे पुन्हा एकदा कृषी विभागाच्या कामावर शंका उपस्थित होऊ लागली आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भागात सुमारे १२ हेक्‍टर कापसाचे क्षेत्र असून, या भागातील ३९ शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्याची बातमी ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर कृषी विभागाने पंचनामे केले. पंचनामे होऊन पंधरा दिवस उलटून गेल्यानंतर कृषी विभागाने ३९ शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या. या नोटिसांमध्ये बियाणे खरेदीच्या पावत्या मागितल्या.

शेतकऱ्यांनी पावत्या जवळ ठेवल्या आहेत. पावत्या जमा करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी गावात येणार होते. पण अद्यापही  पावत्या कृषी विभागाने जमा करून घेतेल्या नाही.

कृषी विभागाने केवळ पंचनामे करून उपयोग नाही, तर पंचनामे केलेला अहवाल कृषी आयुक्ताला सादर केला पाहिजे. परंतु हा अहवाल अद्यापही कृषी आयुक्तालयामध्ये सादर केला नाही. यामुळे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

कापसाचे पंचनामे करून पंधरा दिवस उलटून गेले. आम्हाला बियाणे केलेल्या पावत्या मागितल्या आहेत, पण या पावत्या घेण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारीच गावात येत नाहीत.
                                   - कुमार कोरणगे, खटाव, ता. मिरज.

इतर बातम्या
शासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे...जळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर...
कादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटेचिंचखेड, जि. नाशिक : ‘‘शासनाने इथेनॉल...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...