agriculture news in marathi, officials demands ban on five pesticides | Agrowon

मोनोक्रोटोफॉससह पाच कीटकनाशकांवर बंदीच्या मुदतवाढीची शिफारस
विनोद इंगोले
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

अमरावती ः विषबाधेच्या घटनांमध्ये एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २२ जणांचे बळी गेल्यानंतर काही सर्वाधिक विषारी असलेल्या कीडनाशकांवर बंदी लादण्यात आली होती. साठ दिवसांनंतर या बंदीची मुदत ३१ डिसेंबर २०१७ रोजी संपुष्टात आली. आता पुन्हा नव्याने ३० दिवसांकरिता बंदी लादण्याची शिफारस कृषी आयुक्‍तालयाकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या अधिकारात केवळ ९० दिवस बंदी घालता येते.

अमरावती ः विषबाधेच्या घटनांमध्ये एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २२ जणांचे बळी गेल्यानंतर काही सर्वाधिक विषारी असलेल्या कीडनाशकांवर बंदी लादण्यात आली होती. साठ दिवसांनंतर या बंदीची मुदत ३१ डिसेंबर २०१७ रोजी संपुष्टात आली. आता पुन्हा नव्याने ३० दिवसांकरिता बंदी लादण्याची शिफारस कृषी आयुक्‍तालयाकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या अधिकारात केवळ ९० दिवस बंदी घालता येते.

 यवतमाळ जिल्ह्यात कापाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी सर्वाधिक विषारी श्रेणीतील कीडनाशकाचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे यातील काही कीडनाशकांची कापाशीसाठी शिफारसच (लेबल क्लेम) नव्हती, अशी बाब चौकशीत पुढे आली. यवतमाळ जिल्ह्यातील विषबाधेच्या प्रकरणातील या चौकशीत मोनोक्रोटोफाॅस या अति विषारी कीटकनाशकासह ट्रायझोफॉस व अन्य काही कीटकनाशकांचा वापर झाल्याचे दिसून आले. या माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून कीडनाशके खरेदी केलेल्या पावत्या तपासण्यात आल्या. त्यावरील नोंदीच्या आधारे पाच कीडनाशकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये मोनोक्रोटोफॉस कीटकनाशकाचा देखील समावेश आहे. 

मोनोक्रोटोफॉससह इतर पाच कीडनाशकांवर यवतमाळमधील घटनेनंतर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात ६० दिवस बंदी लादण्यात आली. ही मुदत ३१ डिसेंबर २०१७ रोजी संपुष्टात आली. त्यानंतर आता पुन्हा नव्याने बंदीचा प्रस्ताव कृषी आयुक्‍तालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे सूत्र सांगतात. राज्याच्या कायद्यात केवळ ९० दिवस बंदीचे अधिकार आहेत. त्यानंतरच्या वाढीव कालावधीकरिता   बंदीसाठी केंद्र सरकारची मान्यता लागते. परंतु केंद्र सरकारकडून त्यासाठी मान्यता मिळण्याची प्रक्रिया तेवढी सोपी नाही, असे आधीच्या प्रकरणात सिद्ध झाले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...