agriculture news in marathi, Okra, Dodka, Gawar fasting in Solapur | Agrowon

सोलापुरात भेंडी, दोडका, गवार तेजीत
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडी, दोडका, गवारच्या दरात पुन्हा तेजीचे वातावरण राहिले. त्यांची आवक तुलनेने कमीच होती, पण मागणी असल्याने संपूर्ण सप्ताहभर त्यांच्या दरात तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात दोडक्‍याची रोज २० क्विंटल, भेंडीची १५ क्विंटल आणि गवारीची १० क्विंटल आवक झाली. गेल्या दोन पंधरवड्यापासून त्यांच्या आवकेत आणि मागणीत सातत्याने चढ-उतार होतो आहे. पण सर्वाधिक मागणी असल्याने चांगला उठाव मिळतो आहे. गवार, भेंडी, दोडक्‍याची सगळी आवक ही स्थानिक भागातूनच झाली.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडी, दोडका, गवारच्या दरात पुन्हा तेजीचे वातावरण राहिले. त्यांची आवक तुलनेने कमीच होती, पण मागणी असल्याने संपूर्ण सप्ताहभर त्यांच्या दरात तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात दोडक्‍याची रोज २० क्विंटल, भेंडीची १५ क्विंटल आणि गवारीची १० क्विंटल आवक झाली. गेल्या दोन पंधरवड्यापासून त्यांच्या आवकेत आणि मागणीत सातत्याने चढ-उतार होतो आहे. पण सर्वाधिक मागणी असल्याने चांगला उठाव मिळतो आहे. गवार, भेंडी, दोडक्‍याची सगळी आवक ही स्थानिक भागातूनच झाली.

बाहेरील आवक खूपच कमी होती. सध्या पाण्याच्या टंचाईमुळे आवकेवरही बराचसा परिणाम झाला आहे. त्याचाही परिणाम वाढत्या दरावर होतो आहे. दोडक्‍याला प्रतिक्विंटलला सरासरी किमान ८०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, भेंडीला किमान ४०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये, तर गवारला किमान १००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्यामध्ये मेथी, शेपू, कोथिंबिरीलाही पुन्हा मागणी राहिली. त्यांचे दरही तेजीतच राहिले. भाज्यांची आवक रोज प्रत्येकी ५ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ५०० ते ११०० रुपये, शेपूला ३०० ते ८०० रुपये आणि कोथिंबिरीला २०० ते ७०० रुपये असा आहे.

त्याशिवाय गाजर आणि काकडीलाही काहीसा उठाव मिळाला. त्यांची आवकही जेमतेम रोज १० ते १२ क्विंटलपर्यंत राहिली. गाजराला प्रतिक्विंटल किमान ७०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये तर काकडीला किमान ४०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला.

कांद्याचे दरही टिकून
बाजार समितीच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून
कांद्याच्या आवकेत सातत्याने वाढ होते आहे. पण मागणी असल्याने कांद्याचे दरही काहीसे टिकून आहेत. कांद्याची रोज २० ते ३० गाड्यापर्यंत आवक आहे. जिल्ह्यासह बाहेरूनही आवक होते आहे. कांद्याला प्रतिक्विंटल किमान ४०० रुपये, सरासरी १४०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपयांपर्यंत दर आहे. किरकोळ १०० ते २०० रुपयांचा चढ-उतार वगळता दर टिकून राहिल्याचे सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...