agriculture news in Marathi, one crore for agri based rural industry, Maharashtra | Agrowon

कृषी आधारीत ग्रामीण उद्याेजकता विकासासाठी एक हजार काेटी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

पुणे ः कृषी आधारीत ग्रामीण उद्याेजकता सक्षमीकरणासाठी सहकार विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्य शासन महामंडळाद्वारे एक हजार काेटींचा वित्त पुरवठा ग्रामीण उद्याेजकांना करणार आहे. यामाध्यामातून व्यवसाय अत्याधुनिकरणासाठी तंत्रज्ञान, यंत्रणा, मशिनरींसाठी कर्ज पुरवठा केला जाणार आहे. यासाठी एकूण भांडवलाच्या २५ टक्के स्वतःचे, २५ टक्के सहकार विकास महामंडळ आणि ५० टक्के शासन देणार आहे. सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांनी ‘ॲग्राेवन’ला माहिती दिली. 

पुणे ः कृषी आधारीत ग्रामीण उद्याेजकता सक्षमीकरणासाठी सहकार विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्य शासन महामंडळाद्वारे एक हजार काेटींचा वित्त पुरवठा ग्रामीण उद्याेजकांना करणार आहे. यामाध्यामातून व्यवसाय अत्याधुनिकरणासाठी तंत्रज्ञान, यंत्रणा, मशिनरींसाठी कर्ज पुरवठा केला जाणार आहे. यासाठी एकूण भांडवलाच्या २५ टक्के स्वतःचे, २५ टक्के सहकार विकास महामंडळ आणि ५० टक्के शासन देणार आहे. सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांनी ‘ॲग्राेवन’ला माहिती दिली. 

याबाबतची माहिती देताना आकरे म्हणाले, की सहकार विकास महामंडळाच्या वतीने ग्रामीण उद्याेजकतेला बळकटी देण्याबराेबरच विपणनासाठी पुढाकार घेतला आहे. सद्यःस्थितीतील कृषी आधारित सुरू असलेल्या उद्याेगांची व्याप्ती वाढवून, व्यवसायवृद्धी करण्यात येणार आहे. व्यवसायवृद्धी करावयची आहे; मात्र, आर्थिक क्षमता नसलेल्या उद्याेजकांची निवड करण्यात येणार आहे. यामाध्यमातून क्लस्टर आधारित विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. विविध जिल्ह्यांतील उद्याेजकांचे सर्वेक्षण करून, ही याेजना शासनाला सादर केली जाणार आहे. या याेजनेसाठी शासनाकडून एक हजार काेटींचा निधी महामंडळा मिळणार आहे.

३० जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती
प्रत्येक जिल्ह्यांतून शेतमालाची खरेदी आणि विक्री करण्यासाठी ३० जिल्ह्यांमध्ये जिल्हा व्यवसाय आणि विपणन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर ६ विभागांसाठी विभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती महामंडळाद्वारे करण्यात आली आहे. हे अधिकारी प्रत्येक जिल्ह्यांतील प्रसिद्ध शेतमालाच्या विपणनासाठीचा आराखडा करणार आहेत.

विकास साेसायट्यांद्वारे पंजाबमध्ये शेतमालाची विक्री
अटल महापणन याेजनेअंतर्गत विकास साेसायट्यांना व्यावसायिकतेचे धडे देण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक पातळीवर पाच शेतमालांची निवड केली असून, या शेतमालाचे ब्रँडिंग, पॅकिंग आणि विक्री केली जाणार आहे. यासाठी बाजरी (परभणी), हळद (वर्धा, सांगली), ज्वारी (नगर, जामखेड), काजू (रत्नागिरी), तांदूळ (भंडारा), बेदाणा (सांगली, नाशिक) या शेतमालाची निवड करण्यात आली आहे. यासाठी शेतमाल आणि जिल्हानिहाय १० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, हा सर्व शेतमाल पंजाबमध्ये विक्रीसाठी पाठविला जाणार आहे. याप्रकल्पासाठी व्हिलेज साेशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशनबराेबर करार करण्यात आला आहे.

इतर अॅग्रो विशेष
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...