agriculture news in Marathi, one crore per day benefit to farmers, Maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात दूध उत्पादकांना प्रतिदिन एक कोटी दरवाढ
विकास जाधव
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

सातारा ः जिल्ह्यात गाईचे दैनंदिन २० लाख लिटर दूध संकलन होत आहे. राज्य शासनाने दुधास लिटरमागे पाच रुपये वाढ केल्याने जिल्ह्यात प्रतिदिनी एक कोटी रुपये प्रतिदिन अधिक मिळत आहेत. या दरवाढीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, धोक्यात आलेला दूध व्यवसाय पुन्हा उभा राहण्यास मदत होणार आहे. 

सातारा ः जिल्ह्यात गाईचे दैनंदिन २० लाख लिटर दूध संकलन होत आहे. राज्य शासनाने दुधास लिटरमागे पाच रुपये वाढ केल्याने जिल्ह्यात प्रतिदिनी एक कोटी रुपये प्रतिदिन अधिक मिळत आहेत. या दरवाढीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, धोक्यात आलेला दूध व्यवसाय पुन्हा उभा राहण्यास मदत होणार आहे. 

 दुधाचे दर १८ ते २१ रुपये लिटर गेल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत आला होता. एेन उन्हाळ्यात दराची ही अवस्था तर पावसाळ्यात कसे होईल, या भीतीने अनेक शेतकऱ्यांना दुभती जनावरे विकावी लागली होती. मिळत असलेल्या दरात भांडवली खर्च निघत नसल्याने दुध उत्पादक व्यवसाय तोट्यात चालवत होते.

दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी दूध दरवाढीसाठी जागोजागी आंदोलन करण्यात आली होते. आंदोलनाच्या काळात एकूण दुधापैकी दहा ते अकरा टक्के दुधाचे संकलन होत होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने प्रति लिटर पाच रुपयांने वाढ करत २५ रुपये एक लिटर दर देण्याचा अध्यादेश काढण्यात आला होता. या अध्यादेशाप्रमाणे एक अॅागस्टपासून नवीन दर वाढ लागू करण्यात आली आहे.
 
जिल्ह्यात सुमारे ६९ लहान मोठ्या संस्थांकडून दुधाचे संकलन होते. यामध्ये सहा सहकारी, पाच मलिस्टेट तर ५७ खासगी संस्थाचा सहभाग आहे. २३ लाख लिटरवर दैनंदिन दुध संकलन केले जाते. यामध्ये गाईचे सुमारे २० लाख लिटर दुधाचा हिस्सा आहे. या दुधास प्रतिलिटर पाच रुपयांने वाढ केली असल्याने दैनंदिन एक कोटीचा आधिक लाभ मिळणार आहे.

सध्या जिल्ह्यात दुधाचे संकलन सुरळीत सुरू आहे. वाढलेला दरामुळे किमान तोटा तरी होणार नसल्याने शेतकऱ्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे. या दरवाढीमुळे अर्थिक संकटात सापडलेल्या दुध व्यवसाय उभा रहाण्यास मदत होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...