agriculture news in marathi, One crore funds for health services in Ashadhi wari | Agrowon

आषाढी वारीतील आरोग्य सुविधांसाठी एक कोटीचा निधी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जून 2018

सोलापूर : आषाढी वारीत आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासनाने एक कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली.

सोलापूर : आषाढी वारीत आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासनाने एक कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली.

आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, महाराष्ट्र राज्य आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे, आरोग्य उपसंचालक, पुणे डॉ. संजय देशमुख, उपसंचालक, आरोग्य सेवा लातूरचे डॉ. श्रीरंग बोरसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव आदी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरवातीला पालकमंत्री देशमुख यांनी राज्यातील शासकीय रुग्णालयात देण्यात येणाऱ्या आणि पुरवठा करण्यात येणाऱ्या औषध गोळ्यांच्या पुरवठ्याचा आढावा घेतला. सोलापूरसह राज्यातील अनेक शासकीय दवाखान्यात गोळ्या - औषधांचा तुटवडा असल्याच्या तक्रारी येत आहेत. सध्या स्थिती काय आहे असे आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांना विचारले असता गोळ्या औषध खरेदी ही हाफकीन संस्थेच्या वतीने खरेदी करण्यात येत आहेत, परंतु सद्यःस्थितीत सर्व दवाखान्यांत औषध उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी नसतील तेथे लगेच औषधाचा पुरवठा करण्यात येईल, असे सांगितले.

आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांच्या आणि पायी चालत येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांना दिले. शासनाच्या वतीने आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्यासाठी एक कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

इतर ताज्या घडामोडी
सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त स्थानिक नाव    : काळी अळू...
खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार : पपई दरांमध्ये दर आठवड्याला...
जालन्यात कृषिमाल निर्यात केंद्र सुरू जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर...कोल्हापूर/गडहिंग्लज : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर...
औरंगाबादेत खरबूज प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
विद्यापीठांपेक्षा शेतकरी संशोधनात...सांगली : सध्या विद्यापीठाच्या तंत्रज्ञानापेक्षा...
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...