agriculture news in Marathi, one lac complaint applications regarding pink bowllworm in jalgaon, Maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात बोंड अळीबाबत एक लाख तक्रार अर्ज
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

गुलाबी बोंड अळीसंबंधी पंचनामेही सुरू आहेत. प्राथमिक माहिती शासनाला दिली आहे. आता उपाययोजनांसंबंधी शेतकरी, कापूस उद्योजकांसोबत मोहीम हाती घेतली आहे. 
- अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगाव

जळगाव  ः गुलाबी बोंड अळीने नुकसान झालेल्या कापूस उत्पादकांना तक्रार करण्यासाठी ‘जी’ अर्ज भरून देण्यासाठी येत्या १५ तारखेपर्यंतच मुदत आहे. या मुदतीत अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. त्यासाठी खर्चही येत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. जिल्ह्यात जवळपास एक लाख शेतकऱ्यांचे अर्ज तालुक्‍याच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. 

‘जी’ प्रकारचा अर्ज तलाठी सजा असलेल्या गावातच झेरॉक्‍स केंद्रात पाच ते १० रुपयांना विकत मिळत आहे. हा अर्ज कृषी सहायकांनी आपालल्या कार्यक्षेत्रात वितरित केलेला नसल्याचे चित्र आहे. तर तालुक्‍याच्या ठिकाणी जाऊन हे अर्ज भरायचे आहेत. तालुक्‍यालाही तालुका कृषी विभागात अर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. 

अर्जासोबत सातबारा उतारा, कपाशी बियाणे खरेदीची पावती सक्तीची आहे. धुळे जिल्ह्यातही अशीच परिस्थिती असून, तेथे सुमारे २० हजार अर्ज दाखल झाले आहेत. चाळीसगाव तालुक्‍यात १५ हजार ५००, जळगावात १४ हजार, भुसावळमध्ये तीन हजार, रावेरात चार हजार, जामनेरात १६ हजार, पाचोरा येथे सुमारे १२ हजार, अमळनेरात सुमारे १४ हजार, एरंडोलात चार हजार, धरणगावात पाच हजार, चोपड्यात ११ हजार यावलमध्ये नऊ हजार एवढे अर्ज, मुक्ताईनगरात ११ हजार व बोदवडमध्येही सहा हजारांवर अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे. 

साडेचार लाख हेक्‍टरवर बोंड अळी
जिल्ह्यात पावणेपाच लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यातील सुमारे साडेचार लाख हेक्‍टरवरील कपाशीवर गुलाबी बोंड अळी असल्याचा निष्कर्ष कृषी विभागाने जारी केला आहे. कोरडवाहू कपाशीचे पीक उभे आहे. त्याचे पंचनामे सुरू असल्याची माहिती मिळाली. धुळे जिल्ह्यातही साक्री, शिंदखेडा, धुळे, शिरपुरात अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू आहे. धुळ्यातील दोन लाख हेक्‍टरपैकी ८० टक्के पीक अळीग्रस्त असून, तेथेही उत्पादनावर परिणाम झाला आहे. 

शेतकऱ्यांना खर्चच खर्च
गुलाबी बोंड अळीने एकीकडे शेतकऱ्यांना फटका बसलेला असला, तरी दुसरीकडे मात्र या अर्जांच्या कटकटीमुळे खर्चही करावा लागत आहे. तालुक्‍याला जाण्या-येण्याचे भाडे, सातबारा उतारा तलाठ्याकडून आणणे, असे हेलपाटे खावे लागत असून, त्यासाठी किमान १०० ते १५० रुपये खर्च लागत आहे. 

इतर अॅग्रो विशेष
पैशाकडेच जातोय पैसाभारतातील काही उद्योगपतींची संपत्ती एका वर्षात...
वाढवूया मातीचा कससंयुक्त राष्ट्रसंघाच्या २०११ च्या अन्न व कृषी...
जमीन आरोग्यपत्रिकेच्या गुणात्मक कामाकडे...पुणे  : राज्यात शेतकऱ्यांना जमीन...
'शुगरकेन हार्वेस्टर'ला अनुदान देण्यास...पुणे  : राज्यात ऊसतोडणीसाठी वापरल्या...
भरपाईबाबत समित्यांचे निष्कर्ष बियाणे...पुणे : राज्यात गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान...
कापूस पिकासाठी यवतमाळ जिल्हा पोषक नाहीनागपूर : यवतमाळ जिल्ह्यात उथळ ते मध्यम खोल जमिनी...
साडेचार लाख टन तुरीची महाराष्ट्रात...मुंबई  ः महाराष्ट्र हे देशात महत्त्वाचे तूर...
उस्मानाबाद ९.४ अंशांवरपुणे ः उत्तरेकडून थंड वारे कमी-अधिक प्रमाणात वाहत...
कृषीचा पतपुरवठा यंदा वाढण्याचे संकेतनवी दिल्ली ः देशातील शेतीसमोरील प्रश्न दिवसेंदिवस...
सीआयबीआरसी, कृषी, आरोग्य विभागावर...अमरावती ः विषबाधाप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या...
खारपाणपट्ट्यात पेरू, लिलीसह बहुपीक शेतीखारपाणपट्ट्यात प्रयोगशील शेती करणे जिकिरीचे,...
वाया जाणारा भाजीपाला, शेणापासून...भाजीपाला व जनावरे बाजार यांच्यासाठी सातारा...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
बीजी - ३ चे घोडे अडले कुठे?आगामी हंगाम धोक्‍याचा सन २०१७ च्या खरीप हंगामात...
आव्हान पाणी मुरविण्याचेठिबक सिंचन अनुदानासाठी यावर्षी विक्रमी निधी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...