agriculture news in marathi, One lakh quintals of seed supply from Mahabiya in Parbhani | Agrowon

परभणीत महाबीजकडून एक लाख क्विंटल बियाणे पुरवठा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 जून 2018

परभणी ः महाबीजच्या परभणी विभागांतर्गतच्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध पिकांच्या १ लाख १४ हजार ९७८ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कडधान्य पिकांचे बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड यांनी दिली.

परभणी ः महाबीजच्या परभणी विभागांतर्गतच्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध पिकांच्या १ लाख १४ हजार ९७८ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कडधान्य पिकांचे बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड यांनी दिली.

यंदा खरिपासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे उत्पादक महामंडळाच्या (महाबीज) परभणी विभागांतर्गतच्या सहा जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या १ लाख ४ हजार २५९ क्विंटल तसेच अन्य पिकांच्या १० हजा ७१९ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य) अंतर्गत मूग, उडीद, तूर पिकांच्या प्रात्यक्षिक वितरणासाठी १० वर्षाच्या आतील वाणास प्रतिकिलो ५० रुपये, तसेच १० वर्षाच्या वरील वाणास प्रतिकिलो २५ रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनुदान वजा करता १० वर्षांखालील मुगाच्या वाणांच्या बियाण्याची किंमत प्रतिकिलो ६० रुपये, उडदाचे ५३ रुपये, तुरीचे ५७ रुपये तर १० वर्षांवरील मुगाच्या वाणांचे बियाणे ८५ रुपये, उडदाचे ९५ रुपये, तुरीचे ६८.५० रुपये प्रतिकिलो अशी निश्चित करण्यात आली.

राष्ट्रीय तेलताड योजनेअंतर्गत सोयाबीनच्या १५ वर्षाच्या आतील वाणास प्रतिकिलो ३४ रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनुदान वजा करून ३४ रुपये प्रतिकिलो किंमत ठरविलेली आहे. यामध्ये एमएयूएस-१५८, एमएयुएस १६२, फुले अग्रणी, एमएसीएस-११८८, जेएस-९५-६० आदी वाणांचा समावेश आहे. परंतु या वाणांची उपलब्धता कमी असल्यामुळे शासनाच्या प्रात्यक्षिक योजनेमध्ये वाटप करण्यात येत आहे.

ग्रामबिजोत्पादन योजनेअंतर्गत सोयाबीनच्या जेएस ३३५ वाणांचा अंतर्भाव असून अनुदान वजा जाता ३० किलो वजनाच्या बॅंगची किंमत १३५० रुपये ठेवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत परमिट देऊन सात-बारा, आधार कार्ड आदी कागदपत्राच्या आधारे अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना एक एकर करिता ३० किलो बियाणे प्राधान्याने देण्यात येणार आहे. उर्वरित बियाणे खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना दिले जाईल.

परभणी विभाग पीकनिहाय बियाणे उपलब्धता (क्विंटलमध्ये)
पीक बियाणे
सोयाबीन १०४२५८
तूर १५३९
मूग ११७४
उडीद ४६६७
ज्वारी २१८५
बाजरी २३७
मका ३०५
तीळ २२
सूर्यफूल ५.५२

सद्यःस्थितीत पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस होऊन जमिनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतर पेरणी करावी.
- एस. पी. गायकवाड, विभागीय व्यवस्थापक, महाबीज, परभणी

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...