agriculture news in Marathi, One LED bulb for 4092 rupees, Maharashtra | Agrowon

अबब! एका एलईडी बल्बची किंमत ४०९२ रुपये
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

भंडारा ः चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून एका बल्बची खरेदी ४०९२ रुपये दाखवित ८० बल्बच्या खरेदीतून ३ लाख २७ हजार ४२० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी उपसरपंचासह सदस्यांनी केली आहे. गुंथारा ग्रामपंचायतमध्ये घडलेल्या या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. 

भंडारा ः चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून एका बल्बची खरेदी ४०९२ रुपये दाखवित ८० बल्बच्या खरेदीतून ३ लाख २७ हजार ४२० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी उपसरपंचासह सदस्यांनी केली आहे. गुंथारा ग्रामपंचायतमध्ये घडलेल्या या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. 

भंडारा  पंचायत समितीअंतर्गंत येणाऱ्या गुंथारा येथील सचिव वाय. एच. डोंगरवार, सरपंच शुभांगी सार्वे यांनी या प्रकारात अपहार केल्याचा आरोप आहे. उपसरपंच दिलीप कायते, सदस्य रमेश चावरे, साधू सार्वे, मंदाबाई कमाने, मंजूषा जगनाडे यांनी याप्रकरणी तक्रार केली. महाराष्ट्र पंचायत अधिनियमानुसार सरपंच, ग्रामसेवक यांना पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी दोषी ठरवित पदमुक्‍त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
एलईडी दिव्यांची खरेदी करताना मासिक सभेची परवानगी घेण्यात आली नाही, असाही आरोप सदस्यांचा आहे. कोटेशनही पदाधिकाऱ्यांना दाखविण्यात आले नाही. न्यू चेतन इलेक्‍ट्रॉनिक्‍स या व्यावसायिकाला २१ नोव्हेंबर २०१७ रोजी ८० एलईडी बल्बच्या खरेदीपोटी ३ लाख २७ हजार ४२० रुपये देण्यात आले. एका एलईडी बल्बची खरेदी ४०९२ रुपयांना करण्यात आली.

खरेदी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी हे बल्ब खांबांवरदेखील लावण्यात आले. हा सारा प्रकार गोंधळात टाकणारा असून, याप्रकरणी सविस्तर चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...