आणखी एका कांदा उत्पादकाची मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर

आणखी एका कांदा उत्पादकाची मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर
आणखी एका कांदा उत्पादकाची मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर

सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त झालेल्या बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील शेतकऱ्यांनी आपला रोष प्रकट केला आहे. या शेतकऱ्याने १७ क्विंटल कांदा विकून हातात अवघे ३७० रुपये उरल्याने ६० रुपये पोस्ट खर्च करून ३१० रुपये त्याने गुरुवारी (ता.१३) मनीऑर्डरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहेत. शासनाने शेतकरी वर्गाच्या सुख-दुःखाकडे सपशेल पाठ फिरवली असून, कांद्यामुळे उद्भवलेल्या संकटांची प्रचिती शासनाला येण्यासाठी ही मनीऑर्डर करीत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. सद्यस्थितीत बागलाण तालुक्यात गेल्या वर्षी काढलेला उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात चाळीत पडून आहे. तब्बल वर्षभर प्रतीक्षा करूनही समाधानकारक भाव न मिळाल्याने हा कांदा पडून असून दुसरीकडे नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. सरासरी एक दीड रुपये किलोने कांदा खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे.  तालुक्यातील कंधाणे येथील कांदा उत्पादक शेतकरी रवींद्र भाऊराव बिरारी यांनी बुधवारी (ता.१२) येथील बाजार समितीत नवीन लाल कांदा विक्रीसाठी आणला होता. एक दिवस आधी त्याच कांद्याला ४८५ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला असताना दुसऱ्या दिवशी मात्र त्यास केवळ १५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. त्यामुळे या दिवशी शहरात रस्त्यावर कांदा ओतून चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी बिरारी यांनी या १७ क्विंटल कांद्यातून मिळालेल्या दोन हजार ३७० रुपयांतून दोन हजार रुपये  ट्रॅक्टर भाडे देऊन उरलेल्या ३७० रुपयांत ६० रुपये पोस्टल खर्च केले. उरलेले ३१० रुपये मनीऑर्डरने मुख्यमंत्र्यांना पाठविले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com