agriculture news in marathi, One percent rabi crop loan in Satara | Agrowon

साताऱ्यात अवघा एक टक्का रब्बी पीक कर्जवाटप
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

सातारा : रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, तसेच सहकारी बॅंकांकडून शेतकऱ्यांना ऑक्‍टोबर महिन्यात अवघा एक टक्का पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ११००. १० कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी ऑक्‍टोबर महिनाअखेर १५ कोटी ४६ लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.

सातारा : रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, तसेच सहकारी बॅंकांकडून शेतकऱ्यांना ऑक्‍टोबर महिन्यात अवघा एक टक्का पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ११००. १० कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी ऑक्‍टोबर महिनाअखेर १५ कोटी ४६ लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.

यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सर्वांत जास्त कर्जवाटप केले आहे. या बॅंकेस ५४० कोटीचे उद्दिष्ट असून, या बॅंकेने तीन कोटी २४ लाखांचे वितरण करण्यात आले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी दोन टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांना ४४२ कोटी ८५ लाखांच्या उद्दिष्टांपैकी आठ कोटी ४३ लाख रुपये वाटप केले आहेत. यामध्ये युनियन बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेने सर्वाधिक दोन कोटी म्हणजेच उद्दिष्टाच्या २१ टक्के कर्जाचे वितरण केले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत चार टक्के कमी कर्जवाटप करण्यात आले आहे. गतवर्षी ऑक्‍टोबरअखेर पाच टक्के कर्जवाटप केले होते. रब्बी कर्ज वितरण सुरू होऊन एक महिना उलटला असून, कर्ज वितरण करण्याची मार्चअखेरपर्यंत मुदत आहे. या मुदतीत बँका उद्दिष्ट पूर्ण करणार का ते बघावे लागणार आहे. रब्बी हंगाम हा माण, खटाव, कोरेगाव, फलटण व खंडाळा या दुष्काळी तालुक्‍यांचा प्रमुख हंगाम असल्याने या तालुक्‍यांत रब्बी कर्ज जास्त प्रमाणात वितरण केले जाणार आहे.

खरिपात १२ टक्के कमी कर्ज वितरण
जिल्ह्यात खरीप हंगामात ११६८.७९ कोटी म्हणजेच उद्दिष्टाच्या ७१ टक्के कर्जाचे वितरण आलेले आहे. मागील खरिपात १२५९.८३ कोटी कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. म्हणजेच एकूणच उद्दिष्टाच्या ८३ टक्के कर्जाचे वितरण करण्यात आले होते. गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्के कमी कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.

इतर बातम्या
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...पुणे : राज्यात विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...