agriculture news in marathi, one thousand five hundred farm pond dry in Jat taluka | Agrowon

जत तालुक्यातील दीड हजार शेततळी कोरडी
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 मे 2019

सांगली :  शासनाच्या योजनेतून जत तालुक्यात सुमारे अडीच हजारांहून शेततळी झाली आहेत. ती पिकासाठी वरदान ठरताहेत. पण पाऊस नाही, योजनेचे पाणी नाही. त्यामुळे अडीच हजारांपैकी तब्बल दीड हजाराहून अधिक शेततळी कोरडी आहेत. परिणामी, शाश्वत पाण्याची सोय होत नसल्याने डाळिंब आणि द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.

सांगली :  शासनाच्या योजनेतून जत तालुक्यात सुमारे अडीच हजारांहून शेततळी झाली आहेत. ती पिकासाठी वरदान ठरताहेत. पण पाऊस नाही, योजनेचे पाणी नाही. त्यामुळे अडीच हजारांपैकी तब्बल दीड हजाराहून अधिक शेततळी कोरडी आहेत. परिणामी, शाश्वत पाण्याची सोय होत नसल्याने डाळिंब आणि द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.

कृषी विभागाने मागेल त्याला शेततळे योजना दुष्काळी भागात प्रभावीपणे राबविली. प्रामुख्याने द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. तालुक्यात डाळिंबाचे क्षेत्र सहा हजार हेक्टर, तर द्राक्षाचे क्षेत्र सात हजार हेक्टर आहे. द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकांना शेततळ्यामुळे शाश्वत पाण्याची सोय करता येत आहे. टंचाईच्या काळात परिसरातून पाणी टॅंकरने आणून शेततळ्यात साठवणूक केली जाते. गरजेनुसार शेततळ्यातील पाणी शेतीला देण्याचे नियोजन इथला शेतकरी करीत असल्याचे चित्र आहे.

जत तालुक्यातील वार्षिक पर्जन्यमान सरासरी ४५० मिलिमीटर आहे. परंतु, गेल्या दहा वर्षांत या तालुक्‍याने पावसाची सरासरीसुद्धा ओलांडली नाही. गतवर्षी तालुक्‍यात अवघा २४९.५० मिलिमीटर पाऊस झाला. २०१७ ते २०१८ या पर्जन्यमान सालात तो ३०२ मिलिमीटर झाला. परिमाणी १२३ गावांत पाणीपातळी तीन मीटरने घटली. यामुळे पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी तालुक्यात पोचले, परंतु पूर्व भागात ते पोचले नाही. त्यामुळे ज्याठिकाणी म्हैसाळचे पाणी आहे, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी शेततळे भरून पाण्याची सोय केली आहे.

डाळिंब, द्राक्षाची छाटणी रखडली

जत पूर्व भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी तीस ते चाळीस किलोमीटरपर्यंत जावे लागते. बारा हजार लिटरच्या टॅंकरला पाच हजार रुपये मोजावे लागतात. पैसे देऊनही पाणी मिळत नाही. त्यामुळे शेततळ्यांत पाणी कसे येणार, हा प्रश्न आहे. परिमाणी, डाळिंब आणि द्राक्ष बागांची छाटणी रखडल्याचे चित्र आहे.

इतर ताज्या घडामोडी
अडगाव बुद्रुक येथे केली एचटीबीटी बियाणे...अकोला : अडगाव बुद्रुक (ता. तेल्हारा) येथे सोमवारी...
ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी नियोजनग्रामीण भागात जलसंधारण जर यशस्वीपणे दीर्घकाळ...
बदलत्या वातावरणाने घटेल भाताचे उत्पादन...भारतामध्ये वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या...
नगर जिल्ह्यात  ‘उन्नत शेती’बाबत...नगर ः शेतकऱ्यांना अवजारांचा लाभ मिळण्यासाठी...
मराठवाड्यातील १९८ मंडळांत पाऊसऔरंगाबाद  : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर...
धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत...जळगाव : खानदेशात धुळे जिल्ह्यासह जळगाव,...
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब लागवड मोठ्या...
सांगली जिल्ह्यात पाऊस बरसलासांगली : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) ठिकठिकाणी...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई : युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे यांनी...
सोलापुरात पाऊस; पण जोर कमीसोलापूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) रात्री...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई  ः युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे...
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज...आळंदी, जि. पुणे  ः  सुखालागी जरी करिसी...
विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम...मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ....
पुणे जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात...पुणे   : दुष्काळाने होरपळत असलेल्या...
‘जलयुक्त’मधील गैरव्यवहाराची ‘एसीबी’...मुंबई  ः राज्यात जलयुक्त शिवार अभियानातील...
जळगावात भाजीपाला आवकेत घटजळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
पुणे जिल्ह्यात २२० हेक्टरवर भातपीक...पुणे  ः यंदाच्या खरिपात भात उत्पादनवाढीसाठी...
टाटा-कोयनेचे पाणी वळवू नकाः भावे...पुणे  : टाटा व कोयना धरणातील ११५ टीएमसी पाणी...
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...