एक हजार जेसीबी, पाेकलेन करणार वाटप

एक हजार जेसीबी, पाेकलेन करणार वाटप
एक हजार जेसीबी, पाेकलेन करणार वाटप

पुणे : जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जल व मृद संधारणाच्या कामांसाठी जेसीबी आणि पाेकलेन (अर्थमूव्हर्स) यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्यय याेजना शासनाने जाहीर केली आहे. सुशिक्षित बेराेजगार तरुण, बेराेजगारांची सहकारी संस्था, नाेंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, विविध कार्यकारी साेसायट्यांना ही याेजना लागू करण्यात आली आहे. यामध्ये १७ लाख ६० हजार रुपयांची कमाल मर्यादा ठेवण्यात अाली असून, या याेजनेसाठी शासन पाच वर्षांचे व्याज भरणार आहे. राज्यात एक हजार यंत्रे वाटप करण्यात येणार आहेत.

पात्र लाभार्थ्यास वित्तीय संस्थांकडून कर्ज देण्यात येणार असून, याची कमाल मर्यादा १७ लाख ६० हजार रुपये असणार असून, शासनाच्या वतीने सरळ व्याज पद्धतीने १२ टक्के दराने व्याज पाच वर्षे देण्यात येणार आहे. व्याजाची कमाल मर्यादा ५ लाख ९० हजार रुपये इतकी असणार आहे. लाभार्थ्याने स्वतःचा २० टक्के हिस्सा उभारणे आवश्‍यक असणार आहे. ३१ मार्च २०१८ अखेर लाभार्थी निवडण्यात येणार असून, लाभार्थी निवडीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, कार्यकारी अभियंता लघुसिंचन यांची आणि सदस्य सचिवपदी जिल्हा उपनिबंधकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची नाेडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संगणकप्रणाली ११ नंतर कार्यान्वित महाराष्ट्र सहकारी विकास परिषदेच्या वतीने आॅनलाइन अर्ज मागविण्यासाठी स्वतंत्र संगणकप्रणाली तयार करण्यात येत अाहे. येत्या ११ जानेवारीपासून संगणकप्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर इच्छुक आॅनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत, असे परिषदेतील सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com