agriculture news in Marathi, one thousand subsidy for Gram and Tur witch not purchased by government, Maharashtra | Agrowon

खरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी हजाराचे अनुदान
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर विक्रीसाठी एनईएमएल पोर्टलवर नोंदणी केली, परंतु त्या शेतकऱ्यांचा हरभरा व तूर खरेदी झाली नाही, अशा शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानाची रक्कम सहकार विभागाच्या वतीने ४८० कोटी रुपयांची हमी शासनाने घेतली आहे. ही रक्‍कम खर्च करण्याची जबाबदारी पणन महासंघावर सोपविण्यात आली आहे. 

२०१७-१८ मध्ये ज्या शेतकऱ्यांकडून तूर व हरभरा खरेदी करता आला नाही, अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टर १० क्विंटलला अनुदान मिळणार आहे. जास्तीत जास्त दोन हेक्‍टरला हे अनुदान देण्यात येणार आहे.

सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर विक्रीसाठी एनईएमएल पोर्टलवर नोंदणी केली, परंतु त्या शेतकऱ्यांचा हरभरा व तूर खरेदी झाली नाही, अशा शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानाची रक्कम सहकार विभागाच्या वतीने ४८० कोटी रुपयांची हमी शासनाने घेतली आहे. ही रक्‍कम खर्च करण्याची जबाबदारी पणन महासंघावर सोपविण्यात आली आहे. 

२०१७-१८ मध्ये ज्या शेतकऱ्यांकडून तूर व हरभरा खरेदी करता आला नाही, अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टर १० क्विंटलला अनुदान मिळणार आहे. जास्तीत जास्त दोन हेक्‍टरला हे अनुदान देण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांना खरेदीबाबत एसएमएस पाठविण्यात आला होता, त्या शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणला नाही, अशा शेतकऱ्यांना या अनुदान योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या ज्या शेतकऱ्यांना शेतीमाल आणण्यासाठी एसएमएसच पाठविण्यात आलेला नाही, असे शेतकरी मात्र या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरविण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ देताना शेतकऱ्यांच्या ज्या बॅंक खात्याला आधारची जोडणी केली आहे, त्याच खात्यावर ही रक्कम अदा केली जाणार आहे. 

शासनाने राष्ट्रीयीकृत बॅंकांना दिलेल्या ४८० कोटी रुपयांच्या कर्ज हमीतून कर्ज घेऊन ही रक्कम शेतकऱ्यांना अनुदानापोटी वितरित केली जाणार आहे. या कर्जाचे व्याज राज्य सरकारच्या वतीने दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर या योजनेचे निकष व नियम ठरविण्यात आले आहेत.

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...