agriculture news in Marathi, Onion at 1000 to 3300 rupees in State, Maharashtra | Agrowon

राज्यात कांदा प्रतिक्विंटल १००० ते ३३०० रुपये
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मागील तीन महिन्यांपासून कांद्याचे दर चांगले आहेत. मात्र पावसाने नुकसान झाल्याने उत्पादनाच्या फक्त ३० टक्के कांदाच बाजारात विकता आला.
- दिनकर उगले, गिरणारे, ता. जि. नाशिक

राज्यातील बाजार समित्यांमध्ये मागील महिनाभरापासून कांदा दर काही अंशी स्थिर आहेत. तसेच दर वधारल्याने शेतकऱ्यांनाही कांदा परवडत आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला घाऊक दर १००० ते ३३०० रुपये यादरम्यान मिळत आहेत. आणखी महिनाभर तरी हे दर टिकून राहतील, असा अंदाज आहे.  

पुण्यात २२५० ते ३१०० रुपये
 पुणे बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १८) कांद्याची सुमारे २२५ ट्रक आवक झाली हाेती. यावेळी प्रतिक्विंटल २२५० ते ३१०० रुपयांपर्यंत दर हाेते. हे दर जानेवारीअखेरपर्यंत टिकून राहण्याचा अंदाज व्यापारी विलास रायकर यांनी व्यक्त केला आहे. सध्या कांद्याला चांगले दर मिळत असल्याने शेतकरी उन्हाळी कांद्याची लवकर काढणी करून आेला कांदा बाजारात आणत असून, जुन्या कांद्याची आवक २५ टक्केच असल्याचे येथील व्यापारी श्री. रायकर यांनी सांगितले. १७ जानेवारीला २१,०७७ क्विंटल आवक होऊन १००० ते ३००० रुपये दर मिळाला. १६ जानेवारीला १७,४०७ आवक तर दर १००० ते ३१०० रुपये, १५ जानेवारीला १५,०१८ आवक तर दर १००० दर ३००० रुपये आणि १४ जानेवारीला १५,९६१ क्विंटल आवक होऊन १००० ते २८०० रुपये दर मिळाला.

औरंगाबादेत १२०० ते ३२०० रुपये
येथील बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १८) कांद्याची ५८७ क्‍विंटल आवक झाली. या कांद्याला १२०० ते ३२०० रूरुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. कांद्याच्या आवक व दरात कायम चढ-उतार पाहायला मिळाला. १९ डिसेंबरला आवक ७३६ क्‍विंटल तर १२०० ते ३५०० रुपये दर मिळाला. २७ डिसेंबरला ५५३ क्‍विंटल आवक आणि दर ८०० ते ३२०० रुपये, ४ जानेवारीला ३२७ क्‍विंटल आवक होऊन दर १००० ते ३५०० रुपये राहिला. ११ जानेवारीला ४९५ क्‍विंटल आवक तर दर २००० ते ३५०० रुपये मिळाला. १४ जानेवारीला ४९८ क्‍विंटल आवक होऊन १२०० ते ३००० रुपये दर मिळाला. १७ जानेवारीला ४०३ क्‍विंटल आवक तर दर १००० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटल मिळाला. 

जळगावात ११५० ते २७५० रुपये 
येथील बाजार समितीमध्ये महिनाभरापासून कांद्याचे दर स्थिर आहेत. कांद्याला सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर या महिनाभरात मिळाला आहे. आवकही स्थिर असून, धुळे, जळगाव जिल्ह्यांमधून कांदा येतो. बुधवारी (ता. १७) कांद्याची ३१० क्विंटल आवक होऊन ११५० ते २७५० व सरासरी २४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. जिल्ह्यात चोपडा, एरंडोल, धरणगाव, पाचोरा, यावल, जळगाव रावेर भागात कांद्याची लागवड केली जाते. त्यात अनेक शेतकरी इंदूर येथील बाजारात कांदा विक्रीसाठी नेतात. त्यामुळे स्थानिक बाजारात आवक कमी असते. परंतु जळगावनजीकच्या भागातून कांदा येत असतो. डिसेंबर महिन्यासह या महिन्यातही दर स्थिर असल्याने कांदा उत्पादकांमध्ये समाधान आहे. किरकोळ बाजारातही कांदा ४० रुपये प्रतिकिलोपुढेच विकला जात आहे.

अकोल्यात २५०० ते २८०० रुपये 
बाजारात लाल तसेच पांढऱ्या कांद्याला चांगला दर मिळत आहे. अकोल्यात सध्या लाल कांदा २५०० ते २८०० रुपये तर पांढरा कांदा २००० ते २२०० रुपये क्विंटल दराने विकल्या जात आहे. मागील १५ ते २० दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. येथील बाजारात कांद्याची दररोज सरासरी तीन गाड्यांची आवक आहे. पांढरा कांदा प्रामुख्याने गुजरातमधून येत आहे तर लाल कांदा हा अकोला जिल्ह्यासह बुलडाणा, जळगाव जिल्ह्यांतून विक्रीसाठी येत आहे. किरकोळ बाजारात कांद्याची ३५ ते ४० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. नवीन कांद्याची आवक वधारल्यानंतर दरांमध्ये थोडी घट होण्याची शक्‍यता असल्याचे व्यापारी सूत्रांचे म्हणणे होते.

परभणीत २००० ते ३००० रुपये
बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १८) कांद्याचे दर प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या नाशिक, सोलापूर, नगर जिल्ह्यातून तसेच स्थानिक परिसरातून दर कांद्याची आवक येत आहे. गेल्या महिनाभरात प्रत्येक शनिवारी ४०० ते ७०० क्विंटल कांद्याची आवक होऊन सरासरी प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये दर मिळाले. शनिवारी (ता. १३) ७०० क्विंटल कांद्याची आवक असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये होते. गुरुवारी (ता. १८) किरकोळ विक्री प्रतिकिलो २५ ते ४० दराने सुरू होती, असे व्यापारी मो. आवेस यांनी सांगितले.

कोल्हापुरात १००० ते ३२०० रुपये
येथील बाजार समितीत या सप्ताहात कांद्यास प्रतिक्विंटल १००० ते ३२०० रुपये दर मिळाला. कांद्याची दररोज सात ते आठ हजार पोती आवक सुरू आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत कांद्यास समाधानकारक दर मिळत आहे. बाजार समितीत नगर जिल्ह्यातून कांद्याची आवक होत आहे. सध्या जुन्या कांद्याची आवक फारशी नसल्याने गरजेइतकाच कांदा बाजार समितीत येत आहे. यामुळे कांद्याचे दर समाधानकारक आहे. येत्या पंधरा दिवसात तरी कांद्याचे दर सरासरी दर याच दरम्यान टिकून रहातील अशी शक्‍यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली. १७ जानेवारीला ७१९९ क्विंटल आवक होऊन १००० ते ३२०० रुपये दर मिळाला. १० जानेवारीला ८५०० क्विंटल आवक तर दर १०० ते २९० रुपये, आणि ३ जानेवारीला १०१२० क्विंटल आवक होऊन ९० ते २८० रुपये दर मिळाला.

साताऱ्यात २७०० ते ३३०० रुपये
येथील बाजार समितीत गुरुवारी (ता. १८) कांद्याची ५५० क्विंटल आवक झाली. कांद्यास क्विंटलला २७०० ते ३३०० रुपये दर मिळाला. मागील चार सप्ताहापासून कांद्याचे दर क्विंटलला २५०० ते ३५०० या दरम्यान स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. खटाव, कोरेगाव, माण तसेच सातारा तालुक्‍यातून बाजार समितीत कांद्याची आवक होत आहे. २८ डिसेंबरला कांद्याची ४३५ क्विंटल आवक होऊन क्विंटलला २५०० ते ३००० रुपये दर होता. चार जानेवारीला ४२२ क्विंटल आवक होऊन ३००० ते ३६०० रुपये तर ११ जानेवारीला ४१२ क्विंटल आवक होऊन २८०० ते ३४०० रुपये दर होता. ४० ते ५० रुपये प्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे.   

नाशिकला १५०० ते ३०७७ रुपये
नाशिक बाजार समितीत गुरुवारी (ता. १८) कांद्याला १५०० ते ३०७७ व सरासरी २७०० रुपये दर मिळाले. नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्या व ४५ उपबाजारांमध्ये दररोज सरासरी १ लाख क्विंटल कांद्याची आवक होते. मागील महिन्यापासून कांद्याच्या दरात तेजी असून आवकही स्थिर आहे. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र सरासरी दरात क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांनी उतरण झाली आहे. दरम्यान देशांतर्गत बाजारात गुजरात व राजस्थान येथील कांद्याची आवक सुरू झाली आहे. राज्यात पुणे भागातील उन्हाळ कांद्याची आवकही सुरू झाली असल्याने त्याचा परिणाम दरावर झाला असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सोमवारी (ता.१) १२००० क्विंटल आवक होऊन १४०० ते २९०० व सरासरी २६०० रुपये दर मिळाला. बुधवारी (ता.१०) २११९३ क्विंटल आवक होऊन ११०० ते ३१९० व सरासरी २८५१ रुपये  दर मिळाला. 

ग्राहक कल्याण विभागानुसार...
भारतीय ग्राहक कल्याण विभागानुसार मागील महिनाभरात (१७ डिसेंबर २०१७ ते १७ जानेवारी २०१८) कांद्याच्या दैनंदिन घाऊक दरात घसरण झाल्याची नोंद केली आहे. मुंबई बाजारात १७ डिसेंबरला कांद्याचे घाऊक दर प्रतिक्विंटल ३७५० रुपये होते, त्यात घट होऊन १ जानेवारी २०१८ रोजी ३००० झाले, तर ६ जानेवारीला पुन्हा वाढून ३६०० रुपयापर्यंत गेले. मात्र त्यात पुन्हा घट होऊन १७ जानेवारीला मुंबईत कांद्याला २९५० रुपये दर मिळाला. नागपुरात १७ डिसेंबरला कांदा १३६७ रुपये होता. त्यात घट होऊन १ जानेवारीला १३६७ रुपयांवर पोचला, मात्र पुन्हा दर वाढून ३ जानेवारीला १४६७ रुपये व ७ जानेवारीला कमी होऊन १२६० रुपये झाला, १७ जानेवारीला पुन्हा दर वाढून १६०० रुपये झाला. पुणे येथे १७ डिसेंबरला कांदा २३६७ रुपये होता तर २२ डिसेंबरला कमी होऊन १९०० झाला; परत २९ डिसेंबरला २१३३ रुपयांपर्यंत वाढला, त्यात घट होऊन १३ जानेवारीला १७५६ रुपये आणि १७ जानेवारीला किंचित वाढून १८६७ रुपये झाला. नाशिक बाजारात १७ डिसेंबरला कांदा २९५० रुपये होता. त्यात घट होऊन २२ डिसेंबरला २२६७ झाला आणि ३१ डिसेंबराल वाढून २८५० रुपये झाला. ही वाढ कायम राहून ६ जानेवारीला कांदा २९६६ रुपयांपर्यंत गेला; मात्र १७ जानेवारीला किंचित घट होऊन २८६७ रुपये झाला.

प्रतिक्रिया
गुजरात व राजस्थानच्या कांद्याची आवक सुरू झाली आहे. पुणे भागातील उन्हाळ कांदाही बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. येत्या काळात कांदा दरात अल्प प्रमाणात उतरण होईल. मात्र दर स्थिर राहतील अशी स्थिती आहे.
- खंडू देवरे, कांदा व्यापारी व निर्यातदार, नाशिक

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...