agriculture news in Marathi, Onion at 1800 to 2500 rupees in Nashik, Maharashtra | Agrowon

नाशिकला कांदा १८०० ते २५०० रुपयांवर
ज्ञानेश उगले
मंगळवार, 30 जानेवारी 2018

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गत सप्ताहात प्रतिदिनी सरासरी १ लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. या वेळी कांद्याला क्विंटलला १८०० ते २५०० व सरासरी २००० रुपये दर मिळाले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे दर प्रतिक्विंटल जास्तीत जास्त ३५०० पर्यंत होते. देशभरातून विशेषत: महाराष्ट्र व गुजरात राज्यांतून कांद्याची आवक वाढत असताना त्याचा दरावर परिणाम झाला. दरम्यान गत सप्ताहात कांद्याचे दर १८०० ते २५०० या दरम्यान स्थिरावले. 

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गत सप्ताहात प्रतिदिनी सरासरी १ लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. या वेळी कांद्याला क्विंटलला १८०० ते २५०० व सरासरी २००० रुपये दर मिळाले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे दर प्रतिक्विंटल जास्तीत जास्त ३५०० पर्यंत होते. देशभरातून विशेषत: महाराष्ट्र व गुजरात राज्यांतून कांद्याची आवक वाढत असताना त्याचा दरावर परिणाम झाला. दरम्यान गत सप्ताहात कांद्याचे दर १८०० ते २५०० या दरम्यान स्थिरावले. 

नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या १५ बाजार समित्या व ४५ उपबाजारांतून गत सप्ताहात दिवसाला सरासरी १ लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. यंदाच्या वर्षाअखेर कांद्याचे देशातील उत्पादन हे २३० लाख टनांपेक्षा जास्त होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. देशाची एकूण गरज १५० लाख टनांची असताना अतिरिक्त होणाऱ्या उत्पादनामुळे दर खाली होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या स्थितीत उपलब्ध कांद्याचा देशांतर्गत तसेच देशाबाहेरील बाजारात निपटारा होणे गरजेचे असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

डिसेंबर महिन्यात कांद्याचे किमान निर्यात मूल्य ८५० डॉलर करण्यात आल्याने निर्यात होणाऱ्या कांद्याच्या व्यापारात अडथळे निर्माण झाले. बहुतांश स्पर्धक कांदा उत्पादक देशांचे किमान निर्यात मूल्य हे २०० ते ४०० डॉलर असताना भारतीय कांद्याचे दुपटीने असलेले किमान निर्यात मूल्य हे आयातदारांना परवडणारे नव्हते. या स्थितीत त्याचा परिणाम जागतिक बाजारातील कांद्याच्या मागणीवर झाला.

दरम्यान हे किमान निर्यातमूल्य हटवावे. कांदा निर्यात खुली करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. अखेर केंद्र शासनाच्या पातळीवर याबाबत हालचाली सुरू झाल्या. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एमईपी (किमान निर्यात मूल्य) दीडशे डॉलरने कमी झाली. मात्र त्याचा बाजारावर फार मोठा परिणाम झाला नाही. किमान निर्यात मूल्य संपूर्णपणे काढाणे गरजेचे आहे. तसे झाले तरच कांदा दरातील उतरण थांबेल, असे उमराणे ओनियन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...