पुण्‍यात नवीन कांदा, पालेभाज्यांची आवक वाढली

पुण्‍यात नवीन कांदा, पालेभाज्यांची आवक वाढली

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १७) भाजीपाल्याची सुमारे १७० ट्रक आवक झाली हाेती. प्रमुख आवकेमध्ये नवीन कांद्याची सुमारे २०० ट्रक आवक झाली हाेती. तर पालेभाज्यांमध्ये मेथी आणि काेथिंबिरीच्या प्रत्येकी सुमारे दीड लाख जुड्या आवक झाली हाेती. बाजारात काकडीच्या दरात थाेडी वाढ झाली हाेती. तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर हाेते.  परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये मध्य प्रदेशातून सुमारे २२ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ४ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १५ टेंपो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ५ टेंपो शेवगा, राजस्थान येथून १२ ट्रक गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ३ हजार गोणी आवक झाली हाेती. तर स्थानिक आवकेत सातारी आले सुमारे १ हजार ५०० गाेणी, टॉमेटोची सुमारे ६ हजार क्रेट, हिरवी मिरची सुमारे ५ टेंपो, फ्लॉवर २०, तर काेबी सुमारे २२ टेंपाे, ढोबळी मिरची सुमारे १२ टेंपो, पावटा १० टेंपो, वांगी ८ टेंपो, तांबडा भोपळा १० टेंपो, गवार ६ टेंपो, भेंडीची ८ टेंपो, नवीन कांद्याची सुमारे २०० ट्रक, तर जुन्या काद्यांची अवघी ३ ट्रक आवक झाली हाेती. तर आग्रा, इंदूर आणि स्थानिक भागांतून बटाट्याची सुमारे ७० ट्रक आवक झाली. फळभाज्यांचे दहा किलोचे भाव कांदा : नवा : २५०-३३०, जुना : ३५०-४००, बटाटा : स्थानिक ११०-१४०, परराज्य ७०-१००, लसूण : १५०-४००, आले : सातारी २६० बंगलाेर -२८०, भेंडी : २००-२५०, गवार : गावरान व सुरती ३००-४०० टोमॅटो : ६०-१००, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : १५०-३००, दुधी भोपळा : ६०-१००, चवळी : १५०-२००, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी : १८०-२००, पापडी : १४०-१६०, पडवळ : १५०-१६०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ६०-१००, वांगी : १००-१५०, डिंगरी : १४०-१५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २५०-२८०, तोंडली : कळी ३००, जाड : १४०-१५०, शेवगा : ६००-७००, गाजर : १६०-२००, वालवर : १४०-१८०, बीट : १००-१२०, घेवडा : ४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १४०-१५०, ढेमसे : १४०-१६०, पावटा : १५०-२००, भुईमूग शेंग : ३५०, मटार : २६०-३००, तांबडा भोपळा : ६०-१२०, सुरण : २६०-२८०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर आणि मेथीच्या प्रत्येकी दीड लाख जुड्या आवक झाली हाेती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : २००-५००, मेथी : २००-४००, शेपू : ४००-६००, कांदापात : ८००-१०००, चाकवत : ७००-८००, करडई : ४००-५००, पुदिना : ३००-५००, अंबाडी : ५००-६००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ५००-६००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-६००, पालक : ३००-५००, हरभरा गड्डी : ५००-८००. फळबाजार रविवारी (ता. १७) फळबाजारात मोसंबी ८५ टन, संत्री ७०० पेटी, डाळिंब सुमारे ६० टन, पपई सुमारे २५ टेंपोे, लिंबे सुमारे ८ हजार गोणी, चिकू २ हजार गाेणी, पेरू १ हजार २०० क्रेटस, कलिंगड २० टेंपो, खरबूज १० टेंपो, विविध जातींची सुमारे साडेतीन हजार गोणी, स्ट्रॉबेरी सुमारे दीड टन आवक झाली हाेती. फळांचे दर पुढीलप्रमाणे ः लिंबे (प्रतिगोणी) : ६०-१००, मोसंबी : नवा बहर (३ डझन) : १००-१५०, जुना बहर २४०-३५०, (४ डझन ) : नवा बहर ६०-१००, जुना बहर १३०-२००, संत्रा : (८-१० डझन) १०००-१२००, (११-१५ डझन) : ८००-१०००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-६०, गणेश ५-२०, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२५, पपई : ३-१५, चिकू : १००-५००, पेरू (२० किलो) : ३००-५००, सफरचंद : सिमला (२० ते २५ किलो) : १२००-१८००, काश्मीर डिलिशियस (१५ किलो) ८००-१४००, किन्नोर : (२५ किलो) १६००-२५००, अमेरिकन डिलिशियस : (१५ किलो) १०००-१३००, महाराजा ( १५ किलो) : ४००-५००. बोरे : चेकनट (१० किलो) २००-२५०, चन्यामन्या : ३५०-४५०, चमेली : ५५-७०, उमराण : ३५-४५, स्ट्रॉबेरी (२ किलाे पनेट) २००-३००. मटण मासळी गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १७) खोल समुद्रातील सुमारे ११ टन, खाडीची ४०० किलाे, आणि नदीतील सुमारे ५०० किलो, तर आंध्र प्रदेशातून धरणातील रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे १२ टन आवक झाली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने चिकनच्या भावात किलाेमागे २० रुपयांनी वाढ झाली आहे. तर अंड्याच्या भावातही सातत्याने चढ-उतार होत असून, इंग्लिश अंड्याच्या भावात सलग दुसऱ्या आठवड्यात शेकड्यामागे अठरा रुपयांनी वाढ झाली आहे. भाव (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी ः १४००, मोठे ः १४००, मध्यम ः ९००-१०००, लहान ः ७००-८००, भिला ः ५५०, हलवा ः ५५०, सुरमई ः ४८०-५५०, रावस लहान ः ५००, मोठा ः ६५०, घोळ ः ५५०, करली ः २४०, करंदी ( सोललेली ) ः २४०, भिंग ः २८०, पाला : ५५०-१२००, वाम ः पिवळी ५५०, काळी : ४००, ओले बोंबील ः ८०-१२० कोळंबी : लहान : २८०, मोठी : ४८०, जंबोप्रॉन्स : १५००, किंगप्रॉन्स ः ८००, लॉबस्टर ः १५००, मोरी : २४०, मांदेली : १००, राणीमासा : १६०, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४४०. खाडीची मासळी : सौंदाळे ः २००, खापी ः २००, नगली ः ४००, तांबोशी ः ३६०, पालू ः २००, लेपा ः १००-१८०, शेवटे : २००, बांगडा : १००-१६०, पेडवी ः ८०, बेळुंजी ः १००, तिसऱ्या : १६०, खुबे : १२०, तारली : १०० नदीची मासळी : रहू ः १६०, कतला ः १८०, मरळ ः ४००, शिवडा : १८०, चिलापी : ६०, मांगूर : १४०, खवली : १६०, आम्ळी ः ८०, खेकडे ः १४०, वाम ः ४८०,  मटण : बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे ः ४४०, खिमा ः ४४०, कलेजी : ४८० चिकन : चिकन ः १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २६० अंडी : गावरान : शेकडा : ७००, डझन : ९६, प्रतिनग : ८ इंग्लिश शेकडा : ४१०, डझन : ६०, प्रतिनग : ५ फूलबाजार फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे झेंडू : १०-३०, गुलछडी : ५-३०, बिजली : १०-४०, कापरी : १०-२०, शेवंती : ३०-७०, ऑस्टर : ६-१२, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : ५-१२, ग्लॅडिएटर : ५-१५ गुलछडी काडी : ५-४०, डच गुलाब (२० नग) : २०-६०, लिलीबंडल : ३-६, जर्बेरा : १०-२०, कार्नेशियन : ५०-८० अबोली लड : १००-२६००.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com