agriculture news in Marathi, Onion arrival increased in Nashik, Maharashtra | Agrowon

नाशिकला लाल कांद्याची आवक वाढली
ज्ञानेश उगले
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांदा शेवटच्या टप्प्यात असताना खरिपातील लाल कांद्याची आवक वाढली आहे. गत सप्ताहात लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे, नामपूर या महत्त्वाच्या बाजार समित्यांत दररोज लाल कांद्याची सरासरी २० हजार क्विंटल आवक झाली.

जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांतून दररोजची एक ते सव्वा लाख क्विंटल आवक झाली. या स्थितीत कांद्याला क्विंटलला १००० ते ३८८० व सरासरी २६०० रुपये दर मिळाले.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांदा शेवटच्या टप्प्यात असताना खरिपातील लाल कांद्याची आवक वाढली आहे. गत सप्ताहात लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे, नामपूर या महत्त्वाच्या बाजार समित्यांत दररोज लाल कांद्याची सरासरी २० हजार क्विंटल आवक झाली.

जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांतून दररोजची एक ते सव्वा लाख क्विंटल आवक झाली. या स्थितीत कांद्याला क्विंटलला १००० ते ३८८० व सरासरी २६०० रुपये दर मिळाले.

गत सप्ताहाच्या सुरवातीला सोमवारी (ता. २७) लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची १७,७०० क्विंटल आवक झाली. या वेळी कांद्याला क्विंटलला १००० ते ३८८० व सरासरी ३५०१ असे दर निघाले. सोमवारनंतर मात्र सरासरी दरात ५०० ते ७०० रुपयांनी उतरण झाली. उन्हाळ कांदा संपला असताना, लाल कांद्याची आवक वाढली. यामुळे कांदा दर उतरण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान केंद्र शासनाने ८५० डॉलर किमान निर्यात मूल्य (एमईपी) लावून अप्रत्यक्षपणे निर्यातबंदी केली. त्याचाही काही प्रमाणात परिणाम झाल्याचे सांगितले जाते. देशातील कांद्याची मागणी पाहता त्या तुलनेत कमी आहे. मात्र व्यापाऱ्यांनी या वातावरणाचा फायदा उठवित बाजार पाडल्याचाही आरोप होत आहे.

लाल कांद्याची आवक येत्या काळात वाढत राहणार असून, १६ डिसेंबरनंतर दरात काही प्रमाणात उतरण होण्याची शक्‍यता वर्तवली जात अाहे. या स्थितीत शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या सूत्रांनी केले.

लासलगाव बाजार समितीतील कांद्याची 
आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)
वार (तारीख)---आवक---किमान---कमाल---सरासरी

सोमवार (ता. २७)---१७,७००---१०००---३८८०---३५०१
मंगळवार (ता. २८)---१९.७००---१५००---३७१५---२७१२
बुधवार (ता. २९)---१९,८२८---१००१---३४४१---२६५१
गुरुवार (ता. ३०)---२५.१०८---९५२---३३७०---२४५०
शुक्रवार (ता. १)---२२०३८---१०००---३४७०---२५००

इतर बाजारभाव बातम्या
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल ३३०० ते ४४००...सांगली ः येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक...
सोलापुरात कांद्याचे दर वधारलेलेच सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो हंगाम अंतिम...नाशिक : दसऱ्यापासून सुरू झालेला नाशिक भागातील...
नागपुरात सोयाबीन २८५० ते २९५० रुपयेनागपूर ः पंधरवाड्यापूर्वी २३०० ते २५०० रुपये क्‍...
कोल्हापुरात गवार, मटार तेजीतकोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
पुण्यात पालेभाज्यांची आवक टिकून; दर...पुणे : मार्केट यार्ड येथील भाजीपाला बाजारात सलग...
औरंगाबादेत कांदा १००० ते ३५०० रुपयेऔरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल ५०० ते १२००...परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-...
राज्यात मोसंबी प्रतिक्विंटल १५०० ते...पुणे ः राज्यातील बाजार समित्यांमध्ये मोसंबीची आवक...
नाशिकला लाल कांद्याची आवक वाढलीनाशिक : नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांदा शेवटच्या...
खामगावात सोयाबीन वधारलेअकोला ः नोव्हेंबरच्या सुरवातीला कमी असलेला...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्विंटल २८५० ते...नागपूर ः पंधरवाड्यापूर्वी २३०० ते २५०० रुपये क्‍...
जळगावात टोमॅटो, हिरव्या मिरचीची आवक...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल २३५० ते...अकोला ः येथील बाजार समितीत शुक्रवारी (ता. १)...
परभणीत गाजर प्रतिक्विंटल ६०० ते १२००...परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ४०० ते ५२००...राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याची आवक...
झेंडूच्या दरात मोठी घसरण कोल्हापूर : दिवाळीच्या दरम्यान उच्चांकी असलेल्या...
साताऱ्यात दहा किलो पावटा ४०० ते ५००...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
जळगावात टोमॅटो प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...