agriculture news in marathi, onion arrival in solapur market committee | Agrowon

सोलापूर बाजार समितीत कांद्याची उच्चांकी आवक
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 डिसेंबर 2017

सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता.16) बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच बाजार समितीने कांद्याच्या उलाढालीचा विक्रम मोडला. बाजार समितीमध्ये एकाचदिवशी तब्बल 509 ट्रकमधून (50 हजार 961 क्विंटल) कांद्याची आवक झाली़, पण आवक वाढूनही दर मात्र कमाल 4000 रुपये प्रतिक्विंटलवर राहिला.

सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता.16) बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच बाजार समितीने कांद्याच्या उलाढालीचा विक्रम मोडला. बाजार समितीमध्ये एकाचदिवशी तब्बल 509 ट्रकमधून (50 हजार 961 क्विंटल) कांद्याची आवक झाली़, पण आवक वाढूनही दर मात्र कमाल 4000 रुपये प्रतिक्विंटलवर राहिला.

बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे यांनी ही माहिती दिली़. दरम्यान, गेल्या काही दिवसांत सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढते आहे, पण उठाव चांगला असल्याने दरही टिकून आहे. शनिवारी 4 हजार रुपये दराने 27 क्विंटल तर 2000 रुपये दराने 13 क्विंटल आणि 2225 रुपये या सरासरी दराने 50 हजार 921 क्विंटल कांदा विक्री झाला. सोलापूर बाजार समितीत जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी यासह मराठवाड्यातील तुळजापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड आदी परिसरांतून कांद्याची आवक होत आहे. बाजार समिती प्रशासनाच्या सोईसुविधा, रोख व्यवहार यामुळेच ही उलाढाल वाढत असल्याचे प्रशासक श्री. काकडे यांनी सांगितले. दरम्यान, या माध्यमातून एकाच दिवसात तब्बल 11 कोटी 33 लाख 88 हजार 225 रुपये 3000 हजार शेतकऱ्यांना मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

आवक, उलाढालीचा आलेख वाढताच
पंधरा दिवसांपूर्वी 28 नोव्हेंबरला 426 ट्रकमधून 42 हजार 611 क्विंटल कांदा आला होता. त्यादिवशीही 10 कोटी 97 लाख 23 हजार 325 रुपयांची उलाढाल झाली होती. त्या वेळी कमाल 200 आणि किमान 5000 तर सरासरी 2575 भाव मिळाला. आवकेचा हा विक्रम आज मोडला आहे, असे सचिव विनोद पाटील म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
सोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...
सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
नाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...