agriculture news in marathi, Onion auction start in the Pandhurli sub market | Agrowon

पांढुर्ली उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 जुलै 2018
सिन्नर, जि. नाशिक (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली येथील उपबाजार आवारात बुधवारी (ता. २५) गोणीबंद कांदा लिलावास सुरवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी २१५० गोण्या आवक झाली, तर ११५० ते १४०० रुपयांदरम्यान भाव मिळाला.
 
सिन्नर, जि. नाशिक (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली येथील उपबाजार आवारात बुधवारी (ता. २५) गोणीबंद कांदा लिलावास सुरवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी २१५० गोण्या आवक झाली, तर ११५० ते १४०० रुपयांदरम्यान भाव मिळाला.
 
सभापती विनायक तांबे, उपसभापती सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत दुपारी ४ वाजता कांदा लिलाव पुकारण्यात आले. या उपबाजार आवारात यापूर्वी एकच अडत सुरू होती.  शेतीमालास चांगला भाव मिळण्याच्या हेतूने बाजार समितीने आणखी एक अडतीसाठी जागा लिलावासाठी उपलब्ध करून दिली. पांढुर्ली आवारात यापुढे दोन अडते कामकाज करतील, त्यामुळे भावाची स्पर्धा निर्माण होणार असल्याकडे सभापती तांबे यांनी लक्ष वेधले.
आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार असे ३ दिवस कांदा शेतीमालाचे लिलाव सुरू राहतील. बुधवारी पहिल्या दिवशी पळसे येथील शांताराम गायखे या शेतकऱ्याने आणलेल्या २५ गोण्या १४०० रुपये क्विंटल दराने खरेदी करण्यात आल्या. अरुण हारक, प्रभाकर हारक, विष्णू हारक, दिलीप हारक, विशाल हारक, बाळासाहेबभोर, अरुण वाजे, भरत आरोटे, अनिल शेळके, अंबादास भुजबळ, सुखदेव हगवणे, सोमनाथ दळवी या वेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी आपला कांदा, शेतीमाल प्रतवारी करून दुपारी ३ वाजता पांढुर्ली उपबाजार आवारात विक्रीसाठी आणावा, व्यापाऱ्यांनी शेतीमाल विक्रीची रक्कम शेतकऱ्यांना रोख स्वरुपात अदा करावी, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या.

इतर ताज्या घडामोडी
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...