agriculture news in marathi, Onion Auction stop at Lasalgaon | Agrowon

लासलगावात कांदा लिलाव ठप्प
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 जुलै 2018
लासलगाव, जि. नाशिक  : माल वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेला संप सलग चौथ्या दिवशीदेखील सुरू आहे. खरेदी केलेला शेतीमाल बाहेरगावी पाठवता येणार नसल्याने लिलावात सहभागी न होण्याचा व्यापारी वर्गाने निर्णय घेतला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारपासून  (ता.२४) कांदा, धान्य लिलाव बंद असल्याने ६ कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
 
लासलगाव, जि. नाशिक  : माल वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेला संप सलग चौथ्या दिवशीदेखील सुरू आहे. खरेदी केलेला शेतीमाल बाहेरगावी पाठवता येणार नसल्याने लिलावात सहभागी न होण्याचा व्यापारी वर्गाने निर्णय घेतला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारपासून  (ता.२४) कांदा, धान्य लिलाव बंद असल्याने ६ कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
 
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज एक हजारांहून अधिक वाहने लिलावासाठी येत असतात. दररोज लासलगाव बाजार समितीमध्ये १७ ते २० हजार क्‍विंटल कांद्याची आवक होत असते. मात्र, व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल पाठवण्याची व्यवस्थाही ठप्प असल्याने बाजार समितीतून खरेदी केलेला शेतमाल हा बाहेर पाठवणे शक्य नसल्याने संपूर्ण बाजार समितीत शुकशुकाट दिसत होता.
संप लवकर न मिटल्यास येत्या काही दिवसांत कांद्याचा तुटवडा निर्माण होईल. परिणामी, कांद्याचे बाजारभाव वाढण्याची दाट शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे. 
 
शेतकरी वर्गाने आपला शेतमाल टप्प्या-टप्प्याने विक्रीस आणावा जेणेकरून शेतमालाला चांगला भाव मिळेल, असे जयदत्त होळकर म्हणाले. शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी बुधवारपासून (ता.२५)  व्यापारी वर्गाने कांदा लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंगळवारी (ता.२४) सायंकाळी घोषणा करण्यात आल्याचे मनोज जैन यांनी सांगितले.

इतर बातम्या
थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...
परभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
नाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...