Agriculture News in Marathi, onion auction stopped by traders in Solapur Market | Agrowon

सोलापूर बाजार समितीत कांद्याचे लिलाव रोखले
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याने व्यापाऱ्यांनी बुधवारी (ता.२२) कांदा लिलाव बंद पाडले.
 
दरम्यान, व्यापाऱ्यांनी अचानकपणे घेतलेल्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त झाला. बाजार समिती प्रशासकाकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असताना पुन्हा दोन्ही बाजूंनी गोंधळ झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
 
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याने व्यापाऱ्यांनी बुधवारी (ता.२२) कांदा लिलाव बंद पाडले.
 
दरम्यान, व्यापाऱ्यांनी अचानकपणे घेतलेल्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त झाला. बाजार समिती प्रशासकाकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असताना पुन्हा दोन्ही बाजूंनी गोंधळ झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
 
या सगळ्यांत सुमारे दोन तास व्यवहार ठप्प झाले. बाजार समितीचे प्रशासक-कुंदन भोळे, सचिव विनोद पाटील यांनी व्यापारी, शेतकऱ्यांशी चर्चा करून याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत आश्‍वासन दिल्यानंतर व्यवहार सुरळीत सुरू झाले.
 
बाजार समितीत रोज सकाळी दहा वाजता लिलाव सुरू होतात, पण बुधवारी लिलाव सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडले. बाजार समितीच्या आवारातून गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याची चोरी होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दरात वाढ झाल्याने चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे.
 
त्यामुळे व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडले. कांद्याची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याने एक ट्रक मागे सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान होत असल्याचे या वेळी व्यापाऱ्यांनी सांगितले. 
 
प्रशासनाच्या कानावर या घटना घालूनही चोऱ्या कमी होत नसल्याने व्यापाऱ्यानी लिलाव बंदचे पाऊल उचलले, तसेच लिलावाच्या अगोदर वजन न करता लिलाव झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या मालाचे वजन करावे, अशी मागणी या वेळी व्यापाऱ्यांनी लावून धरली. त्यामुळे वातावरण चांगलेच चिघळले,
 
पण या सगळ्यांमध्ये दूरवरून आलेल्या शेतकऱ्यांना लिलावासाठी ताटकळावे लागल्याने पुन्हा गोंधळ वाढला. त्यात काहींनी काटामारीचा विषयही पुढे केला, या वेळी बाजार समिती प्रशासक श्री. भोळे हे मागण्या मान्य करून लवकरात लवकर बाजार समितीमध्ये सुरक्षा वाढवू, असे सांगत होते. मात्र व्यापारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, पण शेवटी चर्चेतून मार्ग काढण्यात आला आणि दुपारी साडेअकराच्या सुमारास व्यापाऱ्यांनी माघार घेत व्यवहार सुरळीत सुरू झाले.
 
शेतकऱ्यांना फटका
सोलापूर बाजार समितीमध्ये महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी घेऊन येतात. शेतकऱ्यांनी मंगळवारी कांद्याच्या गोण्या भरलेल्या होत्या. त्यानंतर बुधवारी लवकर लिलाव न झाल्याने सुमारे २४ तासांनंतरही तो कांदा गोण्यांमध्येच होता.
 
त्यामुळे या कांद्याचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांचा राग अनावर झाला होता. व्यापाऱ्यांनी त्यांना काय बंद करायचा आहे, तो लिलाव झाल्यानंतर करावा किंवा गुरुवारी (ता.२३) बाजार समिती बंद ठेवावी व तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. या सगळ्यांचा फटका शेतकऱ्यांना बसला.
 
बाजार समितीत रात्री आणि दिवसाही सुरक्षेसाठी पोलिस मागवू, हमाल-तोलार, अडते, व्यापाऱ्यांना आय कार्डची सक्ती करू. कोण चोऱ्या करतो आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. लाखो रुपयांचा खर्च करून बाजार समितीत सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, पण त्याच्यात कांदे भरून ते बंद पाडले जातात. व्यापाऱ्यांनीही परवानाधारक हमाल ठेवावेत.
- कुंदन भोळे, प्रशासक, सोलापूर बाजार समिती, सोलापूर

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...