agriculture news in Marathi, onion auction will be continue in Diwali, Nashik | Agrowon

नाशिकमधील कांदा व्यवहार दिवाळीतही सुरू ठेवा
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

नाशिक ः दिवाळीमुळे व्यवहार बंद ठेवून शेतकरी व सामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नियमितपणे कांद्याचे व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी (ता. १२) कांदा व्यापाऱ्यांना दिले.   

नाशिक ः दिवाळीमुळे व्यवहार बंद ठेवून शेतकरी व सामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नियमितपणे कांद्याचे व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी (ता. १२) कांदा व्यापाऱ्यांना दिले.   

मध्य प्रेदश व कर्नाटकचा कांदा पावसामुळे यंदाही खराब झाला आहे. त्यामुळे दिवाळीत नाशिकच्या कांद्याला चांगले दर मिळण्याची शक्‍यता आहे. याच काळात कांद्याचे व्यवहार बंद राहिले तर त्याचा अंतिमतः फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाच बसण्याची भीती आहे. बाजारात पुरेसा कांदा नसल्याने त्यातून कृत्रिम दरवाढीचा धोका असल्याने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांची तातडीची बैठक घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समित्या या काळातही उघड्या ठेवण्याचे आदेश दिले. चार दिवसांत आलेला माल वितरित करत रोजच्या कांद्याच्या साठ्याची माहिती प्रशासनाला सादर करण्याचे आदेश दिले. कांदा व्यापाऱ्यांनी त्यांच्या अडचणींचा पाढा वाचला. मात्र, शेतकरी हितासाठी या आदेशाचे पालन करावेच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या कालावधीत मजूर नसल्याने आलेला माल खरेदी किंवा विक्री करणे शक्‍य नाही. तसेच कांदा शेतकऱ्यांकडून घेतल्यानंतर ट्रक किंवा रेल्वे वॅगनद्वारे पाठविण्यासाठी, त्याची पॅकिंग करण्यासाठी आठवड्याचा कालावधी आवश्‍यक आहे. त्यामुळे ४८ तासांत तो पाठविणे अशक्‍य असल्याचे सांगत आठ दिवसांची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चार दिवसांची मुदत दिली; पण या मुदतीत तुम्हाला विक्री करावी लागण्याचे स्पष्ट केले. 

तांत्रिक कारणामुळे कांदा पाठविण्यात अडचणी आल्यास तशीही कारणे प्रशासनाला सांगावीत. कांद्यावरून शासनाकडून विचारणा झाल्यास त्याबाबत समर्पक उत्तरे देता येतील, हे त्यांनी स्पष्ट केले. व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कार्यवाहीस सहमती दर्शविली. 

इतर ताज्या घडामोडी
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...
कांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...
'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...
बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...
वीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
नांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...
परभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...
सांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...
नगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...
शिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...
शेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
अण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...